नवी दिल्ली | उपेंद्र कुशवाहा यांनी आज आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उपेंद्र कुशवाहा आता एनडीएतून बाहेर पडले आहेत. दरम्यान, उपेंद्र कुशवाहा त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होतीच. उपेंद्र कुशवाह यांनी देखील स्वतः ट्विट करून “आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचे” स्पष्ट केले होते. बिहारमधील एनडीए आघाडीत आपल्या पक्षाला आवश्यक तेवढे स्थान मिळत नसल्याने उपेंद्र कुशवाहा नाराज होते, अशी माहिती मिळत आहे.
Sources: RLSP Chief Upendra Kushwaha resigns as Union Minister pic.twitter.com/1wKs7AXI3H
— ANI (@ANI) December 10, 2018
Upendra Kushwaha to ANI: I will not participate in the meeting of NDA allies today. (file pic) pic.twitter.com/mM8wdaW1Ff
— ANI (@ANI) December 10, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या आरएलएसपी पक्षाला अधिक जागा मिळाव्यात ,अशी मागणी कुशवाहा यांनी केली होती. मात्र भाजपने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. बिहारमधील एनडीएच्या आघाडीत संयुक्त जनता दलाने पुन्हा केलेल्या प्रवेशाने लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये जागा वाटपावरून संघर्ष निर्माण झाला होता. यात आपल्या योग्य स्थान न मिळाल्याने कुशवाहाअनेक महिन्यांपासून नाराज होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.