नवी दिल्ली | राफेल करारासाठी रिलायन्स कंपनीची निवड भारत सरकारने नव्हे तर आम्हीच केली होती, असे दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी सांगितले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला राफेल करारासंदर्भात दिलेल्या मुलाखतीत एरिक ट्रॅपियर बोलत होते. राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत एरिक यांनी दसॉल्टची भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान मोदींमुळेच रिलायन्स कंपनीला हे कंत्राट मिळाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
We chose Ambani by ourselves. We already have 30 partners other than Reliance. The IAF is supporting the deal because they need the fighter jets for their own defence to be at the top: Dassault CEO Eric Trappier on allegations of corruption in the Reliance-Dassault JV deal pic.twitter.com/GPzjadkWz8
— ANI (@ANI) November 13, 2018
काँग्रेस सत्तेत असताना देखील आम्ही भारतासोबत करार केले होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांनी केलेल्या आरोपांमुळे आम्हाला वेदना झाल्याची भावना एरीक यांनी व्यक्त केली आहे. रिलायन्स कंपनीला विमान निर्मितीच्या क्षेत्राचा काहीही अनुभव नसताना देखील त्यांना राफेलचे कंत्राट दिल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. राफेल कराराच्या खरेदीची संपूर्ण चौकशी झाली तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल, असे विधान राहुल गांधी यांनी काहीच दिवसांपूर्वी केला होते.
I don't lie. The truth I declared before and the statements I made are true. I don't have a reputation of lying. In my position as CEO, you don't lie: Dassault CEO Eric Trappier responds to Rahul Gandhi's allegations, in an exclusive interview to ANI #Rafale pic.twitter.com/K6PMdhg8pF
— ANI (@ANI) November 13, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.