पणजी | काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयपाल रेड्डी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे. मनोहर पर्रीकर यांचे जळूप्रमाणे खुर्चीला चिकटून राहणे कोणत्या नैतिकतेला धरून आहे, अशी टीका जयपाल रेड्डी यांनी केली आहे. “मनोहर पर्रीकर वारंवार नैतिकतेबाबत बोलतात. परंतु, पर्रीकर यांचे जळूप्रमाणे खुर्चीला चिटकून राहणे ही कोणती नैतिकता आहे ?”, असा सवाल जयपाल रेड्डी यांनी केला आहे. गुरुवारी मडगाव येथे पार्टीच्या ‘जन आक्रोश’ रॅली कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी हे विधान केलेले आहे.
Jaipal Reddy,Congress in Panaji,Goa: He talks of morality,what morality is there of Mr. Parrikar sticking to the chair like a leech,I know he is in a position to blackmail Narendra Modi, he was the Defence Minister during Rafale deal. (20.12.18) pic.twitter.com/uF8nvneu6h
— ANI (@ANI) December 22, 2018
गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. त्यामुळे गोव्यातील भाजपचा एक गट आणि सत्ताधारी आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या व्यक्तींची नियुक्ती व्हावी अशी मागणी वारंवार होत आहे. काही दिवसांपूर्वी या मुख्यमंत्रीपदासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे नाव सुचविले जात होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे त्यांना राज्यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नसल्याने हा पर्याय सुचविला जात आहे, असे म्हटले जात होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.