HW News Marathi
राजकारण

…जेव्हा तुम्हाला परदेशी माध्यमे खरेदी करता येत नाहीत !

नवी दिल्ली | संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहत आहेत. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असतातच. आता देशातील सर्वच क्षेत्रातून केवळ राजकीय चर्चा ऐकू येत आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा ही टीकाकारांना न घाबरता आपले मत थेट लोकांपुढे मांडणाऱ्यांपैकी एक मानली जाते. आता रिचा हिने ‘टाईम’ मॅगझिनच्या मुखपृष्ठावरून सध्या देशात गाजत असलेल्या प्रकरणावर खोचक टिपण्णी केली आहे. रिचा हिने “जेव्हा तुम्हाला परदेशी माध्यमे खरेदी करता येत नाहीत” अशा आशयाच्या शीर्षकाखाली ‘टाईम’ मॅगझिनचे मुखपृष्ठ ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर रिचा चढ्ढाने पंतप्रधान मोदींना हा टोला लगावला आहे.

देशभरात जरी विरोधकांकडून पंतप्रधान मोदींवर टीका होत असली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींचे अनेक पुरस्कार, सन्मान देऊन कौतुक झाल्याचेच चित्र आतापर्यंत पाहायला मिळत होते. मात्र, प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान मोदींना टीकेचे धनी व्हावे लागले आहे. ‘टाईम’ या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान मोदींना स्थान देण्यात आले असले तरी यात पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ म्हणजेच ‘भारताला तोडणारा प्रमुख’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपतींचा असा अपमान सहन केला जाणार नाही पवारांनी सरकारला खडसावले

News Desk

शिवसेनेत हिंमत असेल तर मुंबईत ओवेसींना अडवून दाखवावे !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीशी संबंधित नसलेले विषय लोकांसमोर मांडतात

News Desk