परभणी । “राष्ट्रगीत असताना वंदे मातरम् कशाला”? असा सवाल आंबेडकर यांनी उठवला आहे. एमआयएम पक्षांनंतर आता भारिप महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी वंदे मातरमला विरोध केला आहे. वंदे मातरमला फक्त एमआयएम नव्हे तर आमचा ही विरोध आहे. “वंदे मातरम् हे राष्ट्रगीत नाही, त्यामुळे त्यावर सक्ती करता कामा नये”, असे ही आंबेडकर यांनी म्हटले.
“जन-गण-मन असताना आणखी पर्यायी गीत कशाला हवे? भाजपचा राष्ट्रगीतावर विश्वास नाही का” ? असा प्रश्न आंबेडरांनी उपस्थित केला.” परभणीमध्ये पत्रकारांशी आंबेडकर यांनी सवांद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेस पक्षला आमच्याशी मैत्री करायची असती तर एव्हढ्यात हालचाल झाली असती.” दोन महिन्यातून दिल्लीहून कोणतेच संकेत आले नाहीत, याचा अर्थ काँग्रेसला मी आणि वंचित बहुजन चालत नाही,” असा होतो. लोकसभेच्या सर्व जागा आम्ही लढणार आहोत अशी घोषणा ही आंबेडकर यांनी यावेळी केल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीसोबत युती करायला आंबेडकरांनी नकार दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.