HW News Marathi
राजकारण

कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे तरी सरकार जागे होणार आहे का ?

मुंबई | मागील दहा वर्षांतील हाच आकडा 48 हजारांवर आहे आणि त्यातील बळींची संख्या 600 वर. मुंबईतील इमारती कशा ‘सुप्त ज्वालामुखी’ बनल्या आहेत याचा आणखी कोणता पुरावा हवा? अंधेरीच्या कामगार रुग्णालयातील दुर्घटनेने पुन्हा एकदा या धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबईत सोमवारी पुन्हा एकदा अग्नितांडव घडले. अंधेरीच्या कामगार रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीने आठजणांचा बळी घेतला. जखमींची संख्या 160 च्या आसपास आहे. त्यावरून या दुर्घटनेच्या भीषणतेची कल्पना येते. या दुर्घटनेनंतर नेहमीप्रमाणे मुंबईतील इमारती, टॉवर्स, मॉल्स, रुग्णालये यांच्या अग्निसुरक्षेची चर्चा सुरू झाली आहे. अग्निसुरक्षेचे हे भूत नेहमी एखादी दुर्घटना घडली की बाटलीबाहेर येते आणि काही दिवसांनी सगळे शांत झाले की पुन्हा बाटलीबंद होते, मुंबईतील आगीच्या सत्र सुरू आहे, त्यावर शिवसेना पक्षप्रमुख यांनी सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

मुंबईतील इमारती आणि अग्नितांडव हे तर जणू अलीकडे ‘समीकरण’च झाले आहे. या वर्षभरात मुंबईत बारापेक्षा जास्त मोठ्या आगीच्या दुर्घटना घडल्या. मागील दहा वर्षांतील हाच आकडा 48 हजारांवर आहे आणि त्यातील बळींची संख्या 600 वर. मुंबईतील इमारती कशा ‘सुप्त ज्वालामुखी’ बनल्या आहेत याचा आणखी कोणता पुरावा हवा? अंधेरीच्या कामगार रुग्णालयातील दुर्घटनेने पुन्हा एकदा या धोक्याचा इशारा दिला आहे. या दुर्घटनेत हकनाक बळी गेलेल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे तरी सरकार आणि प्रशासन जागे होणार आहे का?

मुंबईत सोमवारी पुन्हा एकदा अग्नितांडव घडले. अंधेरीच्या कामगार रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीने आठजणांचा बळी घेतला. जखमींची संख्या 160 च्या आसपास आहे. त्यावरून या दुर्घटनेच्या भीषणतेची कल्पना येते. या दुर्घटनेनंतर नेहमीप्रमाणे मुंबईतील इमारती, टॉवर्स, मॉल्स, रुग्णालये यांच्या अग्निसुरक्षेची चर्चा सुरू झाली आहे. अग्निसुरक्षेचे हे भूत नेहमी एखादी दुर्घटना घडली की बाटलीबाहेर येते आणि काही दिवसांनी सगळे शांत झाले की पुन्हा बाटलीबंद होते. आताही अंधेरीच्या आगीबाबत तेच घडत आहे. केंद्र सरकारने या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केले आहे. ते ठीकच आहे, पण सरकार आणि प्रशासकीय यंत्रणांची हीच तत्परता दुर्घटना होण्यापूर्वी का दिसत नाही? त्यांचे प्रशासकीय घोडे प्रत्येक वेळी दुर्घटनेनंतर का धावते? दुर्घटनाग्रस्त कामगार रुग्णालयाबद्दलही हेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या रुग्णालयाची अग्निरोधक यंत्रणा कुचकामी ठरली, आपत्कालीन नियंत्रण व्यवस्थापनाचा अभाव होता, असे आरोप होत आहेत. रुग्णालयाचे ‘फायर ऑडिट’ 2009 पासून झाले नव्हते, या इमारतीला केवळ तात्पुरते ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले होते. अनेक त्रुटींमुळे अंतिम एनओसी देण्यात आली नव्हती, असेदेखील सांगण्यात येत आहे. या गोष्टी खऱ्या असतील तर

दुर्घटनेचे गांभीर्य

अधिकच वाढते. निवासी किंवा व्यावसायिक इमारतीत अशी दुर्घटना घडली की संबंधित व्यक्ती, बिल्डर अथवा सोसायटीला दोषी धरता येते. मग आता अंधेरीतील कामगार रुग्णालयातील अग्निप्रलय आणि त्यात हकनाक गेलेले आठ बळी यासाठी कोणाला जबाबदार धरायचे? रुग्णालयात रुग्ण येतात ते आपला जीव वाचावा म्हणून, पण तेच रुग्णालय केवळ प्रशासकीय हलगर्जीपणामुळे रुग्णांसाठी ‘यमदूत’ ठरत असेल तर कसे व्हायचे? कोणतीही दुर्घटना सांगून होत नाही. ती शंभर टक्के रोखता येत नाही हे खरे असले तरी निदान दुर्घटनारोधक यंत्रणा चांगली असेल, आपत्ती व्यवस्थापन कार्यक्षम असेल तर जीवितहानी कमीतकमी होऊ शकते. अंधेरीतील अग्निप्रलयात अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक नागरिक आणि इतरांनी प्रयत्नांची शर्थ केली. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. मात्र रुग्णालय व्यवस्थापन आणि प्रशासनाचे काय? राज्य सरकारने आता नेहमीप्रमाणे या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकार अशा किती चौकश्या करणार आहे? मुंबईतील इमारती आणि अग्नितांडव हे तर जणू अलीकडे ‘समीकरण’च झाले आहे. या वर्षभरात मुंबईत बारापेक्षा जास्त मोठ्या आगीच्या दुर्घटना घडल्या.

मागील दहा वर्षांतील

हाच आकडा 48 हजारांवर आहे आणि त्यातील बळींची संख्या 600 वर. मुंबईतील इमारती कशा ‘सुप्त ज्वालामुखी’ बनल्या आहेत याचा आणखी कोणता पुरावा हवा? बहुमजली इमारती ही मुंबईची अपरिहार्यता आहे हे मान्य केले तरी त्या ‘असुरक्षित’ असाव्यात असा त्याचा अर्थ होत नाही. बहुमजली इमारतींना असलेली काचेची तावदाने हादेखील एक नेहमीचा वादाचा प्रश्न. तोही या दुर्घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तर या तावदानांना आक्षेप घेतले जातच आहेत, पण आगीसारखी दुर्घटना घडते तेव्हा आधी या काचा फोडाव्या लागतात आणि मग जीव वाचविण्यासाठी शर्थ करावी लागते. शिवाय काचांमुळे आगीची तीव्रता वाढते ती वेगळीच. मात्र त्याचा विचार ना इमारती बांधणारे करतात, ना संबंधित सरकारी यंत्रणा, ना तेथे राहणारे. सरकारच्या अखत्यारीतील कामगार रुग्णालयाची अग्निसुरक्षा जेथे वाऱ्यावर सोडली जाते तेथे इतर इमारतींचे काय? कधी कुठल्या इमारतीत कशामुळे त्याचा भडका उडेल आणि त्या अग्नितांडवात किती निष्पापांचा बळी जाईल हे सांगता येत नाही. अंधेरीच्या कामगार रुग्णालयातील दुर्घटनेने पुन्हा एकदा या धोक्याचा इशारा दिला आहे. या दुर्घटनेत हकनाक बळी गेलेल्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे तरी सरकार आणि प्रशासन जागे होणार आहे का?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मिशा काय, भुवया पण काढून टाकेन”, उदयनराजेंचे शिवेंद्रराजेंना आव्हान

Aprna

…तर काँग्रेसमध्ये एकही माणूस शिल्लक राहणार नाही !

News Desk

गुजरात विधानसभेत मिळालेल्या विजयानंतर सामनातून पंतप्रधान मोदींचे कौतुक

Aprna