मुंबई | “तुमचे खरे काडतूस हे सीबीआय आणि ईडी आहे. म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली आहे. तुम्ही ईडी आणि सीबीआयला बाजूला ठेवून या”, असा धमकी वजा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्येला मारहाण केल्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी (5 एप्रिल) ठाण्यात रोशनी शिंदेला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा देवेंद्र फडणवीसांना ‘फडतूस’ अशा शब्दात त्यांच्यावर हल्लाबोल केला. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रे उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावर संजय राऊतांनी आज (5 एप्रिल) पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीसांना भिजलेले काडतून असा उल्लेख करत त्यांच्यावर हल्लाबोल केली.
संजय राऊत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने अत्यंक कठोर शब्दात नपुंसक आणि नामर्द म्हटले आहे. तुम्ह जरात शब्दोकोश पाहा. शब्दोकोशात फडतूस असा अर्थ आहे की, युजलेस आणि बिन कामाचे लोक आहे. हे सरकारच बिन कामाचे आहे. त्याला फडतूस शब्द वापरला. त्याच्यामध्ये भिजलेले काडतूस ऐवढे आत जाण्याचे कारण नाही. घुसायचे, तुम्ही काडतूस असाल हो, असे भिजलेले काडतूस या महाराष्ट्रात आम्ही खूप पाहिलेत. भिजलेली काडतूसे उडत नाहीत. तुमचे खरे काडतूस तर ते ईडी आणि सीबीआय आहे. म्हणून तुमच्या सर्वांची मस्ती आणि जरबी आहे. तुम्ही ईडी आणि सीबीआयला बाजूला ठेवून या. मग आम्ही तुम्हाला दाखवतो काडतूस कुठे घुसते.”
…ते सगळे मिस्टर झुकेच
नागपूरमध्ये सावरकरांची गौरव यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या फडतूस विधानाला प्रत्युत्तर दिलेले आहे, असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारल्यावर ते म्हणाले, “आम्ही कुठे म्हटलो झुका म्हणून ते सगळे मिस्टर झुकेच आहेत. खर म्हणजे, पण, आम्ही कोणाला झुका, वाका, हे एवढे वाकलेत एवढे वाकलेत की, वाकून वाकून मोडून पडले आहेत. पहा, काल उद्धव ठाकरे हे ठाण्यात गेले, ठाण्यात आमच्या एक महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या टोळीतील गुंडांनी डॉ. मिंद्येंच्या टोळींतील गुंडांनी ज्या प्रकारे हल्ला केला. निर्घृण, अमाणश एका महिलेवर ती महिला जखमी झाली. तिला इसपिसतळात दाखल केली. काल रात्री उशीरा तब्यात जास्त बिघडली म्हणून लिलावती रुग्णालयात दाखल केली. तिला पाहण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनी असंख्य कार्यकर्ते गेले. आणि लोक जमले. तिच्यावरती हल्ल्याचे कारण काय? त्या महिलेच्या पोटात लाता मारताना तुम्ही प्रत्येक्ष पाहाताय आणि म्हणताय आम्ही हात नाही लावला. त्या महिलेवर मातृत्वासाठी उपचार सुरू आहे. ती म्हणत होती की, माझ्या पोटावर लाथा मारू नका. तरीही पोलीस काही करत नव्हते. कार्यकर्ते त्यांच्या गुंडाटोळ्या मारत होत्या. हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आता असे सरकार ज्या राज्यमध्ये आहे. त्या सरकारलाच सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हटले आहे. हे काही आम्ही म्हटले नाही. उद्धव ठाकरेंनी अत्यंत सौम्य शब्द वापरला. आता फडतूसचा अर्थ नागपूरात वेगळा असेल. आम्ही नागपूरचे आहोत, आम्ही कुठले आहोत. आम्ही पण महाराष्ट्रातलेच आहोत. महाराष्ट्रामध्येच नागपूर आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर वेगळे नाही. वेगळे होऊ देणार नाही. फडतूस हा शब्द जो आहे. हा मराठी भाषेतील प्रचलित शब्द आहे.”
संबंधित बातम्या
नुसती ‘फडणवीसी’ करणारा माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय! – उद्धव ठाकरे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.