HW News Marathi
क्रीडा

भारतीय हॉकी संघाचा जादुई खेळाडू ध्यानचंद

गौरी टिळेकर | राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून २९ ऑगस्ट हा दिवस भारतात साजरा केला जातो. १९२८, १९३२ आणि १९३६ साली भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू ध्यानचंद सिंग यांचा हा जन्म दिवस. ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी इलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील समेश्वर सिंग हे ब्रिटिश भारतीय सेनेत होते. ध्यानचंद यांनी त्यांच्या १९२६ ते १९४८ सालापर्यंतच्या क्रीडा कारकिर्दीत ४०० हून अधिक गोल्स केले. लहान वयात ध्यानचंद यांना खेळाबद्दल विशेष आकर्षण नव्हते मात्र त्यांना कुस्ती आवडत असे. पुढे रांची येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांना खेळाबद्दल रस निर्माण होऊ लागला. वयाच्या १६व्या वर्षी ते भारतीय लष्करात भरती झाले.

१९३६ साली ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने जर्मनीच्या हॉकी संघाला पराभूत केले. त्यानंतर हिटलरने ध्यानचंद यांची सर्वोत्तम कामगिरी पाहून त्यांना जर्मनीच्या लष्करात येण्याची विचारणा केली होती. परंतु ध्यानचंद यांनी त्यासाठी स्पष्ट नकार दिला. ध्यानचंद यांच्या कारकिर्दीतील सुवर्णपदकाचा कमाईनंतर भारत हॉकीमध्ये प्रभावशाली संघ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५६मध्ये भारत सरकारने ध्यानचंद यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जाणारा पद्मभूषण प्रदान केला.

आंतरराष्ट्रीय हॉकीच्या मैदानावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवून त्यांनी आपल्या देशालादेखील गौरवाचा शिखरावर पोहोचवले. राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर त्यांनी आपल्या कामाचा सुवर्ण ठसा उमटवला. ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने भारतीय क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मनाचा मानला जाणारा जीवनगौरव पुरस्कार मेजर ध्यानचंद पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी राष्ट्रपती भवनात देशाचे राष्ट्रपती देशातील सर्वोत्तम खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोहलीचा नवा विक्रम, सचिनला टाकले मागे

News Desk

महिला क्रीडापटूंच्या यादीत एडलवाईज ग्रुपकडून धावपटू हिमा दासचा समावेश

News Desk

पाकिस्तानमधील २ नेमबाजांना व्हिसा नाकारल्याने ‘आयओसी’ची भारतावर कारवाई

News Desk