नवी दिल्ली | गेल्या महिन्यात झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यात हाँग काँगकडून खेळणाऱ्या नदीम अहमद याच्यासह अन्य ३ खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून या तिन्ही खेळाडूंवर २०१४ मधील मॅच फिक्सिंग प्रकरणी केले गेलेले आरोप निश्चित करण्यात आले आहेत. हे तिन्ही खेळाडू पाकिस्तानी वंशाचे असून हाँग काँगकडून खेळतात. आयसीसीने नदीमसह अन्य दोन खेळाडूंवरही आरोप निश्चित केले आहेत.
BREAKING: Irfan Ahmed, Nadeem Ahmed and Haseeb Amjad of Hong Kong have been charged with breaching the ICC Anti-Corruption Code.
All three players have been provisionally suspended with immediate effect.https://t.co/EFNtZdZFKf pic.twitter.com/gr9wE1oYBt
— ICC (@ICC) October 8, 2018
इरफान अहमद आणि हसीब अमजद अशी इतर दोन खेळाडूंची नावे आहेत. यातील इरफान अहमद हा नदीमचाच भाऊ आहे. इरफान २०१४ मध्ये आणि हसीब अमजद २०१६मध्ये हाँग काँगकडून खेळला होता. इरफान अहमदवर मॅच फिक्सिंगचे नऊ आरोप करण्यात आले आहेत. एप्रिल २०१६पासून आयसीसीकडून इरफानवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर नदीम अहमद आणि हसीब अमजदवर आयसीसीकडून भ्रष्टाचार विरोधी कलमअंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.