HW News Marathi
क्रीडा

फ्रान्समधील टेनिस स्पर्धेत रुईयाचा विश्वजीत सांगळे विजयी

फ्रान्स | फ्रान्समधील कॅनी बॅरीव्हीले इथे नुकत्याच पारपडलेल्या फ्रेंच फेडरेशन टेनिस (F.F.T) अंतर्गत लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या विश्वजीत संजय सांगळे याने विजेतेपद मिळविले. पुरूष एकेरी स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विश्वजितने फ्रान्सच्या इस्टेनबन पोटेन शेअर याचा ७-५,६-७,१-६ असा धुवा उडवत विजयाला गवसणी घातली.

F.F.T व G.C.S.T. यांच्या सहयोगाने झालेल्या ह्या स्पर्धेत अनेक देश विदेशातील टेनिसपटू सहभागी होतात. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विश्वजितने अर्जेन्टिनाचा रैलोट क्लेमेंट याला ६-४,६-४ असे सरळ सेट मध्ये नमवून अंतिम फेरीत जागा निश्चित केली होती.

विश्वजित हा मूळचा सातारा मधील फलटणचा आता मुंबईतील मुलुंड येथे स्थायिक झाला आहे. वयाच्या 12व्या वर्षा पासून तो टेनिस खेळत आहे. अनेक देशपातळीवरील व राज्यपातळीवरील स्पर्धांचे जेतेपद त्याचा नावावर आहे. त्याने ह्या आधी देखील सिंगापूर, फ्रान्स, किर्गीस्थान ह्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करून तिथे उत्तरे कामगिरी केली आहे. खेळा बरोबरच तो रुईया महाविद्यालयात आपले उच्च शिक्षण पूर्ण करत आहे . त्याचा यशाबद्दल त्याचा कुटुंबात व मित्रपरिवारात जल्लोषाचे वातावरण आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून महिला हॉकी वर्ल्डकपला सुरुवात

News Desk

आचरेकरांनी दिलेला दम सचिन यांच्या कायम लक्षात राहिला

News Desk

चौथ्यांदा विजेतेपद भूषविणाऱ्या मुंबई इंडियन्सची आज मिरवणूक

News Desk