HW News Marathi
क्राइम

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर

मुंबई | अखेर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam) जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात राऊतांचा जामीन मंजूर केला आहे. परंतु, राऊतांच्या जामीनाला ईडीने विरोध केला आहे.  राऊतांच्या जामीन अर्जावर न्यायालयात आज (9 नोव्हेंबर) सुनावणी पार पडली. राऊतांसह प्रवीण राऊत यांना देखील जामीन मंजूर झाला आहे. राऊतांना तब्बल 100 दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे.

राऊतांना न्यायालयाने 2 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.  मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयात राऊतांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ईडी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. ईडीने राऊतांच्या जामीन स्थिगितीसाठी आजच्या सुनावणीदरम्यान जोरदार युक्तीवाद केला होता. यापूर्वी राऊतांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालयात लेखी स्वरुपात उत्तर राखून ठेवला होता. यावर आज सुनावणीदरम्यान न्यायधीश एम. जी देशपांडेंनी ऑर्डरची कॉपी वाचली आणि त्यावर सही केली आणि त्यानंतर न्यायाधीशांनी प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांना जामीन मंजूर केल्याचे सांगितले.

ईडीने राऊतांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी 31 जुलै रोजी सकाळी ईडीन छापा टाकला. यानंतर राऊतांनी 9 तासांची चौकशी केल्यानंतर ईडी त्यांना ताब्यात केली. यानंतर ईडी कार्यालयात देखील राऊतांची 7 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली. यानंतर राऊतांना पीएमएलए न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर राऊतांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले. यानंतर गेल्या तीन महिन्यापासून राऊत हे तुरुंगात आहे. या तीन महिन्यात अनेक वेळा राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. परंतु, नेहमी राऊतांच्या न्यायालयीन कोठीड वाढ करण्यात आली.

न्यायालयात युक्तीवाददरम्यान नेमके काय झाले

एएसजी अनिल सिंग हे न्यायालयात ईडीचे वकील जे राऊतांविरोधात युक्तीवाद करत आहेत. अनिल सिंग यांनी न्यायालयासमोर विनंत केली की, “राऊतांच्या जामीन अर्जावर स्थगिती आणण्यासाठी त्यांचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य करावा. जेणे करून ईडीला राऊतांच्या जामीन अर्जाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आम्हाला म्हणजे ईडीला संधी मिळायलाच हवी, अशी मागणी त्यांनी केली. कारण हे छोटे मोठे प्रकरण नसून यात मोठी नावे सहभाग आहे. या आठवड्यात न्यायालयाचे केवळ दोन कामकाजाचे दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर आठवड्याभराची स्थगिती द्यावी, ज्यामुळे ईडी निकालाचा अभ्यास करून पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात दाद मागू शकेल, अशा युक्तीवाद ईडीचे वकील सिंग यांनी केला. यानंतर राऊतांच्या जामीन अर्जावर आज दुपारी न्यायालय निकाल देणार आहे. उच्च न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.”

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Related posts

अमेरिकेचा सिरियावर हल्ला, ४२ ठार

News Desk

शिवसेना पदाधिकारच्या कारने शाळकरी मुलींनी चिरडले

News Desk

पोलिसांमुळे महिला वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न फसला

News Desk