HW News Marathi
Uncategorized

१७ व्या लोकसभा निवडणुकीत ७८ महिला खासदार संसदेत जाणार

नवी दिल्ली | १७ व्या लोकसभा निवडणुकीत देशभरात विविध पक्षातून सर्वात जास्त ७८ महिला खासदार संसदेत जाणार आहेत. देशातील ५४२ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत ७८ महिलांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ५४ उमेदवार दिले. त्यापाठोपाठ भाजपचे ५३ महिला उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते.

लोकसभा निवडणुकीत, देशातील सर्वधिक महिला उमेदवार देणारा राज्य म्हणून पश्चिम बंगाल ठरला आहे. बंगाल मधील एकूण ४२ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यातील १४ महिला उमेदवारांना विजय मिळवता आला आहे. यात, टीएमसच्या ११ तर भाजपकडून ३ महिलांना खासदार पदाची संधी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये १० महिला उमेदवार या विजयी ठरल्या आहेत. त्यातील ९ महिला खासदार भाजपकडून तर कॉंग्रेसकडून एकट्या सोनिया गांधी या महिला खासदार म्हणून विजयी झाल्या आहेत.

ओडीसामध्ये सुद्धा ८ महिलांना यावेळी संसदेत जाण्याची संधी मिळाली आहे. यात भाजपने २१ जागांपैकी ७ ठिकाणी महिलांना संधी दिली होती. यातील ६ ठिकाणी त्यांना यश मिळाले आहे. तर, भाजपच्या २ महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. देशात यावेळी महिला खासदार यांची संख्या ऐतिहासिक ठरली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC आरक्षणासंदर्भात राज ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया…

Aprna

दारूबंदी असताना दारू पिऊन पाच ठार

News Desk

अक्षय कुमारने झाडला रस्ता

News Desk