HW News Marathi
Uncategorized

ऐन सणासुदीच्या मुहूर्तावर सोने महागणार

मुंबई | अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा परिणाम पेट्रोलनंतर सोन्याच्या किंमतीतही दिसून येत आहे. पेट्रोलच्या दारवाढीनंतर शनिवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या ४७ दिवसात १४०० रुपयांमध्ये वाढ दिसत आहे. दहा ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना ३१,६०० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच चांदीच्या किंमतीत ५५० रुपयात वाढ झालेली दिसून अली आहे.

एप्रिल महिन्यात सोन्याचा भाव घसरला त्यामुळे महाराष्ट्र राज्यात सोन्याचा भाव जवळपास २७००० च्या सुमारास झाला होता. तेव्हा बाजारात ग्राहकांची खरेदी वाढली होती. मात्र, भाव वाढताच ते कमी होण्याच्या अपेक्षेने ग्राहकांनी खरेदी थांबविली, असे असले तरी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी पाहता सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता नाही.

दसऱ्यात सोन्याच्या भाव उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांचे अवमूल्यन झाल्यास सोन्याच्या दरात वाढ होत राहणार आहे. उन्हाळ्यात लग्नसराईत सोन्याने ३० हजारांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर भावात घसरण होऊन १७ ऑगस्ट रोजी सोने ३० हजारांच्या खाली आले.

जीएसटीमुळे सोने महागणार

दहा ग्रॅम सोन्यामागे ३१ हजार ६०० रुपये दर असला तरी जीएसटीसह ही किंमत ३२ हजार रुपये होत आहे. सोन्याच्या किंमतीत सुरू असलेली ही दरवाढ वर्षाच्या अखेरपर्यंत शेवटपर्यंत राहणार असल्याने दिवाळी आणि इतर सणासुदीला सोने महाग होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालना येथे सैन्य भरती

News Desk

अयोध्या प्रकरणातील १८ पुर्नविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

News Desk

कुठे अडचणी, कुठे दिलासा! Sameer Wankhede प्रकरण कुठपर्यंत आलंय?

swarit