HW News Marathi
Uncategorized

फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी २ सदस्यीय समितीची स्थापना

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खुलासा केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त अमितेश सिंह यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारवर करण्यात आला आहे. याच आरोपाच्या तपासणीसाठी ही समिती नेमण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या नाट्यादरम्यान शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते, असा आरोप काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता.

राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नसून राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिले नव्हते. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होते. माझी एकच विनंती आहे की, तत्काळ चौकशी करुन त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी, अशी माहिती देत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला होता.

संजय राऊतांनी काय केला होता खुलासा?

“फोन टॅप होत आहेत, हे मला आधीच माहिती होते”, अशी ग्वाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. राऊत पुढे म्हणाले की, “भाजप राज्यातील विरोधकांचे फोन टॅप होते होते. हे मला अधीच माहिती होते. परंतु मी फोन टॅपिंगला गांभीर्याने घेतली नाही. विरोधकांवर पाळत ठेवणे हे राजकारण नाही, असे बोलून भाजवपर निशाणा साधला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन टॉप होत,” अशी माहितीही राऊतांनी माध्यमांना दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०२२ मध्ये शरद पवारांना राष्ट्रपती बनविणार | संजय राऊत

News Desk

NEET – तात्पुरती गुणवत्ता यादी 20 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द होणार

News Desk

मुंबई विद्यापीठाचे निकाल पाच दिवसांत लावतो

News Desk