HW News Marathi
राजकारण

“शिवसेना ही मोठी संघटना, यात दोन गट मला नको,” दीपाली सय्यद यांची भावना

मुंबई | “शिवसेना ही मोठी संघटना आहे. यात जे दोन गट पडलेले आहेत. ते मला नको होते,” अशी भावना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली होती. सय्यद यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नवनिर्वाचित एकनाथ शिंदे हे दोघे भेटणार असल्याचे ट्वीट दीपाली सय्यद यांनी केले आहे. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. या पार्श्वभूमीवर सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे-ठाकरे भेटसंदर्भात केलेले ट्वीट ही भावना असल्याचे म्हटले.

दीपाली सय्यद म्हणाले, “शिवसेना ही मोठी संघटना आहे. यात जे दोन गट पडलेले आहेत. ते मला नको होते. मला पूर्णपणे शिवसेना गट म्हणजे पूर्ण शिवसेना एक आहे. यासाठी मी जी मध्यस्थिती घेतलेले आहे. ज्या काही भावना आहे. ते मी तुमच्यासमोर मांडते. जे मला दिसले मला कुठे तरी दिसले, मला जाणविते की, प्रत्येकाच्या मनात जाणविते की एकत्र येईचे आहे. कुठे ना कुठे तरी मान अपमान इगो अडकला गेलेला आहे. मी ती गोष्ट सर्वांसमोर सांगू इच्छिते. आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आदरणीय उद्धवसाहेब या दोघांनी जर पुढाकार घेतला तर आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत. आमची इच्छाजी आहे ती व्यक्त करण्याचा अधिकार आम्हाला आहे. तो अधिकार घेऊनच मी ते मांडलेले आहे. जे काही आहे ते मी तुमच्यासमोर ट्वीटद्वारे लिहिलेले आहे.”

“साहेबांनी बोलविलेले आहे. आणि आणि या सगळ्यांनी यावे. या जर गोष्टी झाल्या तर सर्व जण एकत्र येतील. फक्त एवढेच आहे की, इकडकडून कोणी बोलत नाही. नाही की आम्हाला येईचे आहे. कुठे तरी कुठली तरी गोष्टी अडतीय. ती अडते ती तोडण्याचा प्रयत्न माझा चालू आहे.  उद्धव ठाकरे यांच्याशी तुमचे काय बोलणे झाले का? पत्रकारांच्या प्रश्नावर सय्यद म्हणाले, “माझे दोन्ही ठिकाणी बोलणे झालेले आहे. जे काही मला बोलण्यातून जाणवले गेले आहे. तेच मी ट्वीटद्वारे लिहिलेले आहे,”  सय्यद ट्वीटसंदर्भात म्हणाल्या आहे.

संजय राऊतांनी दीपाली सय्यद यांच्यासंदर्भात केलेल्या वक्त्यव्यावर प्रतिक्रिया दिली

सय्यद यांनी ट्वीटमध्ये भाजप नेत्याचे आभार मांडले ते नेमके कोण आहेत, पत्रकारांच्या प्रश्नावर त्या म्हणाले, “ते कोणी असेल तर मला बोलण्याचा अधिकार नाही. जे कोणी असेल ते तुम्हाला लवकरच कळेल. सय्यद या अभिनेत्री आहेत त्यांना हे अधिकार कोणी दिले त्यांनी जपून विधान करावे, असे राऊत बोले यांसदर्भात सय्यद म्हणाले, “जपून बोलावे, मी संजयसाहेबांना एवढेच सांगेन मी एक साधी कार्यकर्ता आहे. मी एक शिवसैनिक आहे. आणि प्रत्येक शिवसैनिकांना बोलण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार ठेवून काम करते. मी एक शिवसैनिक म्हणून आजपर्यंत काम करत आहे. मी एक शिवसैनिक म्हणून लढा दिलेला आहे. माझी इच्छा आहे की, जे तुटलेले घर आहे. ते पुन्हा एकत्र यावे, आणि मला वाटत नाही की, यात मला कुठल्या कोणाच्याही परवानगी घेण्याची गरज आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INX Media Case: पी. चिदंबरम यांना ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी

News Desk

मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk

राजकीय नेत्यांचे निवृत्तीचे वय ठरलेले नसते, सुमित्रा महाजन यांचा नाराजीचा सूर

News Desk