HW News Marathi
Uncategorized

नवाब मलिक हे एका चिडीतून सगळं करताय शिवसेना खासदार संजय राऊतांच वक्तव्य

मुंबई। पत्रकार परिषदेत बोलत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे. ते न करता रोज सकाळी आरोप प्रत्यारोप होत आहेत. कुठेतरी याला मर्यादा घातली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे एका चिडीतून सगळं करतायत हे मला माहिती आहे. त्यांच्या कुटुंबावर जो प्रसंद आणि संकट आलं होतं ते आम्ही जवळून पाहिल आहे. त्यामुळे कोणीतरी प्रमुख व्यक्तीने पुढाकार घेऊन मार्ग काढला पाहिजे. प्रमुख व्यक्ती मुख्यमंत्री किंवा शरद पवार आहेत. ज्यांना महाराष्ट्राच्या हिताची आणि प्रतिष्ठेची चिंता आहे, असेही राऊत म्हणाले.

मलिकांचे आरोप संतापातून

यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’हे आरोप-प्रत्यारोपाच राजकारण थांबले पाहिजे. या आरोपांच्या चिखलफेकीत मोठ्यांनी लक्ष देणं गरेजचं आहे. नवाब मलिकांचे आरोप संतापातून होत आहेत. काल मी राज्यपालांना भेटलो त्यांनी देखील यावर चिंता व्यक्त केली.’दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’कुणी कोणता फोटो दाखवला तर तो सबंध असल्याचा पुरावा होऊ शकत नाही. रियाज भाटीचे फोटो नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील आहेत. भाजपाकडे जी वॉशिंग मशीन आहे त्यामध्ये घातले की सगळे स्वच्छ होतात. ती मशीन भाजपाने तयार केली आहे. गुंड, दाऊद, शकीलचे लोक आमच्याकडे असले तर याचा माणूस त्याचा माणूस मात्र भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये गेला की एकदम चकचकीत शुभ्र होतो. सध्याच्या राजकारणात कोणीही कोणाकडे बोट दाखवू नये. महाराष्ट्रात रोज चिखलफेक सुरू आहे यांना कंटाळा कसा येत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इतर प्रश्नाकडे पाहायला हवं.’

राज्याचे मंत्रीही दहशतवाद्यांशी संबंधित

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील आरोप-प्रत्यारोपांवरुन चिंता व्यक्त केली असून ते म्हणाले की,’दहशतवाद्यांशी संबंध आहेत असे आरोप कालपासून सुरु झाले आहेत. जे आरोप करत आहेत त्यांना सिद्ध करावं लागेल. कारण या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राची मोठी बदनामी होत आहे. यामुळे दोन्ही बाजूंना पुरावे सादर करावे लागतील, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे दहशतवाद्यांसोबत, बनावट नोटां छापणाऱ्यांसोबत संबंध आहेत असा आरोप झाला आहे. राज्याचे मंत्रीही दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. हे सिद्ध करावं लागले. पण काँग्रेससाठी जनतेचे मुद्दे महत्त्वाचे आहेत.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई काँग्रेसला बुडवण्यासाठी निरूपम यांचा हातभार

News Desk

‘नाणार’ प्रकल्प रद्द केल्यामुळे प्रमोद जठार देणार भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

News Desk

मला दिल्लीत इंटरेस्ट नव्हता ,राज्यसभेवरून संजय काकडेंचा यु-टर्न!

Arati More