HW News Marathi
Uncategorized

सेक्सबाबत पुरूष स्वार्थी असल्याचा महिलांचा आरोप

लंडन: सेक्सच्या बाबतीत पुरुष स्वार्थी असतात. असे या सर्व्हेतून समोर आले या सर्वेत सहभागी झालेल्या बहुतांश महिलांचे हे मत आहे की सर्व पुरूष सेक्स बाबतीत स्वार्थी असतात.,

deccanchronicle.com या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, सेक्सची इच्छा निर्माण झाल्यानंतर शरीससुख मिळवताना पुरुषांमधला स्वार्थीपणा दिसून येते. सेक्स करताना पुरुषाला जे समाधान हवे असते तेच सुख आपल्या जोडीदाराला मिळाले पाहिजे याची काळजी पुरुषाने घेतली पाहिजे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे

या अभ्यासातून अनेक महिलांनी व्यक्त केले की, सेक्स दरम्यान पुरुष स्त्रीच्या लैंगिक भावनांचा विचार करत नाहीत. फक्त स्वत:पुरता विचार करतात. तीन पैकी दोन महिलांनी अशाच पद्धतीचे मत व्यक्त केले. पुरुषांना मात्र हा आरोप मान्य नाही. सेक्स करताना जोडीदाराच्या समाधानाला आपले पहिले प्राधान्य असते, असे पुरुषांनी सांगितले. तर याच अभ्यासात पुरुष केवळ स्वत:चा विचार करतात हा समज चुकीचा असल्याचे पुरुषांनी सांगितले. सेक्स करतानाही अनेक पुरुष आपल्यातील पुरुषी अहंकाराची भावना दाखवून देत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. योग्य माहिती आणि जोडीदारांमध्ये संवाद यातून ही समस्या सुटू शकते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ऐन सणासुदीच्या मुहूर्तावर सोने महागणार

swarit

बेल्जियमची राणी मुंबईत

News Desk

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रवास आता प्रबोधनकार ठाकरेंच्या शिवसेनेकडे !

Arati More
क्राइम

सैन्यात भरती झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

हिंगोली – सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अमोल नामदेव पतंगे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे.

कळमनुरीतालुक्यातील मौजे कामठा येथील रहिवासी असलेला तरुण अमोल नामदेव पतंगे (वय 19 वर्षे) हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अहमदपूर येथील भरतीपूर्व सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी गेला होता. नुकताच तो सैन्यात भरती झाला होता. सोमवारी (4 सप्टेंबर) त्याने औरंगाबाद येथे कागदपत्रं जमा केले व रात्री उशीरा घरी परतला. यानंतर दुस-या दिवशी सकाळी 8 वाजता त्यानं चुलतभावासोबत चहा घेतला. त्यानंतर घरात एकटाच टीव्ही पहात बसला.

आणि मग त्यानं घरात गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.घरातल्यांची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने अमोलला बाळापूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करीत असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related posts

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण; आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

News Desk

ICICI बँक घोटाळ्याप्रकरणी चंदा आणि दिपक कोचर यांना जामीन मंजूर

Aprna

मजबुरी का नाम कोण?

News Desk