HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमधील वडवणीत नगरपंचायतच्या मतदान केंद्राबाहेर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

बीड | राज्यात ३२ जिल्ह्यातील १०५ नगरपंचायत आणि भंडारा गोदिंया जिल्हापरिषद निवडणुकांसाठी आज (२१ डिसेंबर) मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान बीडच्या वडवणीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला आहे. भाजप – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि त्यानंतर मतदान केंद्राच्या गेटवरच दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली आहे.

मतदान केंद्राच्या गेटवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून सोम्य लाठीचार्जही करण्यात आला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. 

बीड जिल्ह्यातील ५ नगरपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात

बीड जिल्ह्यात आज ५ नगरपंचायतीसाठी प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील वडवणी, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या ५ ठिकाणच्या नगरपंचायतीसाठी हे मतदान होत आहे. या ५ नगरपंचायतमध्ये एकूण ८५ उमेदवार आहेत. त्यापैकी २० जाग्यावर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने, निवडणूक होणार नाही. मात्र उर्वरित ६५ जागांसाठी बीड जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी तब्बल २१६ उमेदवार आपलं भविष्य आजमावत असून निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर या मतदानाला सकाळी साडे सात वाजल्यापासून सुरुवात झाली असून सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत सुरू असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुलाबराव पाटील यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

शहर सोडून जाऊ नका ,शहरांवर बाॅम्ब पडलेला नाही !

Arati More

उपअधीक्षकाकडून छेडछाड झाल्याचा आरोप करत महिलेचा मंत्रालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न!

News Desk