मुंबई | शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले असून येत्या दोन-चार दिवासत फडणवीसांची भेट घेणार असल्याचे आज (10 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, “तीन महिन्यानंतर हाताला घड्याळ बांधलेले आहे. जगातील कोणत्याही तुरुंगात कोणाला वाटत असेल की, लोक मज्जेत राहत असतील तर नाही. तुरुंगात खूप त्रासात राहावे लागते. त्यामुळे तुरुंगाची संकल्पना बनवण्यात आलेली आहे. पण, आता बाहेर आलेलो आहे. लोकांनी जोरदार स्वागत केले. आणि प्रेम दिले. मला तर वाटले होते की, लोक मला तीन महिन्यानंतर विसरुन जातील. मी कालपासून पाहिले, आजही पाहिले. मी आज उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार आहे. उद्धव ठाकरे हे काल माझ्यासोबत फोनवरून बोलत होते. आज सकाळी शरद पवारांचा पण मला फोन आला होता. शरद पवार त्यांचीपण तब्यत ठिक नाहीये. शरद पवारसाहेबांना ही माझी खूप काळजी होती आहे. मी शरद पवारांची भेट घेणार आहे. खूप लोकांचे मला फोन येत आहेत.”
न्यायालयाने काल ज्याप्रमाणे ऑर्डर दिल्यामुळे देशभरात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. मला त्यावर टीप्पणी करणार नाही, त्यावर मला बोलायचे नाही, ज्या ज्या लोकांनी काररस्थान रचले होते. त्यांना आनंद झाला असेल, तर मी त्यांच्या आनंदात सहभागी आहे. माझ्यामनात कोणाबद्दल काहीच तक्रार नाही. जे काही मला आणि माझ्या पक्षाला भोगायचे होते ते आम्ही भोगले आहे. माझ्या कुटुंबाने खूप काही गमवले आहे. आयुष्यात असे होत असते. आम्ही राजकारणात आहोत. परंतु, अशा प्रकारचे राजकारण देशाच्या इतिहासात कधी पाहिली नाही. आपला देश 150 वर्ष गुलामीमध्ये होता. त्या काळातही अशा प्रकारचे राजकारण आपण पाहिले आहे. दुश्मनसोबत देखील चांगली वर्तवणूक केली जाते. तरी पण मी मान्य करतो की, मी पूर्ण यंत्रणेला दोष देत नाही. मी कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेला दोष देणार नाही. चांगले काम करण्याची संधी त्या ही मिळाली पाहिजे.”
सरकारने चांगले निर्णय घेतले
राज्या नवीन सरकार स्थापन झालेले आहे. या सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. मी त्याचे स्वागत करतोय, आम्ही विरोधाला विरोध करत आम्ही केले नाही आणि करणारही नाही. जी गोष्टी राज्य, देश आणि जनतेसाठी चांगल्या असतील त्याचे नेहमी स्वागत केले पाहिजे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी चांगले निर्णय घेतले आहेत. मला तुरुंगात जेव्हा पेपर वाचायला मिळत होते. तेव्हा मी ते वाचायचो मी पाहिले की त्यांनी चांगेल निर्णय घेतले. खासकरून गृहविभागच्या माध्यमातून गरिबांसाठी घरे देण्याचा निर्णय, म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय. आमच्या सरकारने ते अधिकार काढून घेतले होते. मला ते चांगले वाटले नव्हते. म्हाडाला पुन्हा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. मला हा निर्णय चांगले वाटले, असे अनेक निर्णय आहेत. सरकार सरकार असते, चांगल्या निर्णयाचा स्वागत झाले पाहिजे.
कारागृहात भिंतीशी संवाद साधावा लागतो
तुरुंगात तुम्ही कसा वेळ घालवत होतात, पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर राऊत म्हणाले, “कारागृहातही माझी तब्यात खराब होती. आताही माझी तब्यात खराब आहे. कारागृहात राहणे ही काही आनंदाची गोष्ट नाही. तुरुंगाच्या ज्या भिंती आहेत. त्यांच्याशी बोलावे लागते. कारागृहात खूप मोठ मोठ्या भिंती असतात. यावेळी बाहेरच्या जगाशी काही संबंध नसतो. कारागृहातील भिंतीशी बोलत होतो. एकातात बोलावे लागत होते. मी कारागृहात असताना विचार करायचो की, वीर सावरकर 10 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात कसे राहू शकले. लोकमान्य टिळक मंडाल्यमध्ये 6 सालसे जास्त केसे राहिले. आणीबाणीच्या काळात अटलबिहारी वाजपेयीपासून मोठ मोठे नेते कारागृ हात दोन-दोन वर्ष कसे राहिले. याबद्दल मी विचार करतोय की, ठिक आहे. जे राजकारणात असल्याने कधी ना कधी तुरुंगात जावेच लागते. तर मी पण गेलो.
उपमुख्यमंत्र्याशी घेणार भेट
तुम्ही आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांशी भेट घेणार, पत्रकारांनी विचालेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले, “नक्कीच, मी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांची भेट घेणार आहे. जेव्हा मी तुरुंगात होते, तेव्हा दोन्ही नेत्यांनी माझी काळजी घेतली. माझ्या कुटुंबांशी काळजी घेतली. त्यांनी प्रत्येक वेळी मदत केली आहे. मी सर्वांच भेटणार आहे. मी येत्या दोन-चार दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पण भेट घेणार आहे. मी काही लोकांच्या कामासाठी फडणवीसांची भेट घेणार आहे. मी नक्कीच भेटणार आहे.
राज्याचे नेतृत्व आजही फडणवीस करत
उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहात, परंतु, मुख्यमंत्र्यांना तुम्ही नाही भेटणार, असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाले, “मला असे वाटते की, राज्याचा जो कारभार आहे. उपमुख्यमंत्री चालवित आहेत. माझे जे निरीक्षण आहे, या राज्याचे नेतृत्व आजही फडणवीस करत आहेत. ते अनुभवी नेता आहेत. आणि खूप सारे महत्वाचे निर्णय मी त्यांच्या तोंडातून ऐकले आहेत. माझे जे काम आहे हे फडणवीसांच्या विभागाशी निगडीत आहेत.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.