HW News Marathi
मुंबई

रुग्णालय बंद असल्याने रुग्णांचे हाल, प्रशासन मात्र झोपे; राजेश शर्मा यांचे गंभीर आरोप

मुंबई : अंधेरी-एमआयडीसी (Andheri-MIDC) येथील कामगार हॉस्पिटला (Kamgar Hospital) आग (Fire) लागून १७ डिसेंबरला चार वर्षे पूर्ण झाली. या आगीत १३ जणांचा मृत्यू (Death) झाला होता. 4 वर्षे उलटून देखील येथील हॉस्पिटल अजून बंद अवस्थेत आहे. रुग्णालय बंद असल्याने हजारो कामगार रुग्णांची गैरसोय होत आहे. कामगारांना खासगी दवाखान्यात (Private Hospital) उपचार घ्यावे लागत आहे. रुग्णालय सुरू करण्यात दिरंगाई होत असल्याने रुग्णालय प्रशासन (Administration) व कंत्राटदार (Contractor) यांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शर्मा यांनी केंद्रीय कामगार मंत्री (Union Minister of Labour) भुपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांच्याकडे केली आहे.

 

केंद्रीय कामगार मंत्री भूपेश यादव यांना राजेश शर्मा यांनी पत्र पाठवून ढिम्म रुग्णालय प्रशासन व कामचुकार कंत्राटदार यांच्या चौकशीची मागणी केली आहे. “कामगार राज्य विमा योजनेचे (Workers’ State Insurance Scheme) अंधेरीतील रुग्णालय हे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल (Super Specialty Hospital) म्हणून कार्यरत होते. या ठिकाणी राज्यभरातून कामगार वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येत होते. हे रुग्णालय बंद असल्यामुळे कामगारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. रुग्णालय प्रशासनाने जनतेला गृहित धरले आहे. पण आपण या प्रकरणाची दखल घेऊन रुग्णालय सेवा लवकर सुरू करावी अन्यथा जनतेत रोष उत्पन्न होईल.”, असेही शर्मा म्हणाले.

 

 

रुग्णालय का बंद आहे?

अंधेरी-एमआयडीसी येथील कामगार हॉस्पिटला 17 डिसेंबर 2018 रोजी आग लागली होती. या आगीमुळे 14 हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी देखील गेला होता. यानंतर ह्या रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी जवळपास अडीचशे कोटीहून अधिक रकमेची तरतूद देखील करण्यात आली. मात्र अद्याप हे रुग्णालय दुरुस्ती वाचून पडून आहे. दुर्घटनेनंतर प्रशासनाने हे रुग्णालय बारा महिन्यांत सुरु होईल असे आश्वासन दिले होते. मात्र, आता तब्बल 48 महिने उलटून देखील परिस्थिती जैसे थे आहे. कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या तरी सुद्धा हॉस्पिटल सुरु झाले नाही. त्यामुळे रुग्णालय सेवेत कधी येणार हा प्रश्न आता हजारो कामगार रुग्ण विचारत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भांडारकर संस्थेत तोडफोड करणारे संभाजी ब्रिगेडचे ६८ जण निर्दोष

News Desk

महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला | मुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk

खडसेंना फसविण्याचा दमानियांचा कट

Adil