HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“कागदावर शिंदे गटाला नाव आणि चिन्ह मिळाले, पण…”, संजय राऊतांची बोचरी टीका

मुंबई | “कागदावर तुम्हाला नाव आणि चिन्ह मिळाले. पण, शिवसैनिक आणि जनता मिळालेली नाही”, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर केली आहे. कोकणातील खेडमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत आज (५ मार्च) माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर टीका केली. खेडच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठाकर गटात प्रवेश करणार आहे. ठाकरे गटात प्रवेश करणा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे मुळचे शिससैनिक असल्याचेही संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

पादाधिकारी निघून जाऊ नयेसाठी सभा घेत आहेत, असे विरोधक म्हणत आहेत, यावर संजय राऊत म्हणाल, “ज्यांना निघून जायाचे ते निघून गेले. आता जे आहे ते सगळे निष्ठावंत आहेत. ज्यांना पळून जायाचे होते. ज्यांना पलायन करायचे होते. ते सगळे लोक निघून गेलेले आहेत. आणि ते सर्वजण निघून जाऊन सुद्धा शिवसेना आजही त्याच ताकदीने उभी आहे. निघून गेलेल्यामुळे आमच्या शिवसेनेवर काही परिणाम झाला का?, तर आजीबात नाही. कागदावर तुम्हाला नाव आणि चिन्ह मिळाले. पण, शिवसैनिक आणि जनता मिळालेली नाही. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. जनता आणि शिवसेना कोणाला सुपूर्त करण्याचा. हा कागदावरचा निर्णय आहे. तो कागदावरच राहिल.”

ठाकरे गटात प्रवेश करणारे मुळेच शिवसैनिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे ठाकरे गटात प्रवेश करत आहेत, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “तरी ही काही ठिकाणी असे कार्यकर्ते प्रमुख शिवसेनेते प्रवेश करत आहेत. हे सत्य आहे. आणि त्या बाबत फार कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. हे मुळचे शिवसैनिकच आहेत. खेडमध्ये जे प्रवेश होत आहेत. ते मुळचे शिवसैनिक आहेत. आणि खेडची जागा आणि आसपासच्या जागा जिंकण्यासाठी. या येणाऱ्या कार्यकर्त्यांचा भविष्यामध्ये फार मोठा फायदा होणार आहे.”

खलिस्थानी भूतवर येताना दिसते  

काश्मीर पंडितांची हत्या होत आहेत, खलिस्थानी टोकेवर काढत आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “हे मी कशाला सांगायला पाहिजे, आठ दिवसापूर्वी संजय शर्मा या काश्मीर पंडिताची त्याच्या बायकोसमोर पुलवामाच्या भर बाजारात हत्या झाली. याआधी किमान गेल्या काही महिन्यांपूर्वी १७-१८ काश्मिरी पंडितांना दिवसा ठवळ्या मारण्यात आले. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या काश्मिरी पंडितांना सरकारी कार्यालयात घुसून मारले जाते. शेकडो काश्मिरी पंडित त्याचा आक्रोश घेऊन आजही जम्मूच्या रस्त्यावर बसेलेल आहेत. भाजपकडून ना एखादा मंत्री गेला ना, ना एखादा नेता गेला. पण, मी स्वत: जाऊन जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांचा आक्रोश ऐकलेला आहे. म्हणून मला ही वेदना आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी खलिस्थानींचे भूतवर येताना दिसत आहे. ही जबाबदारी फक्त राज्य सरकारवर टाकून चालणार नाही. सीमावर भाग आहे, देशाच्या बाह्य आणि अंतरी सुरक्षेची जोडलेला हा विषय आहे. केंद्राची ही जबाबदारी तेवढेच आहे. “

Related posts

“राजू शेट्टींनी टोकाची भूमिका घ्यायची गरज नव्हती” – जयंत पाटील

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला खराब हवामानाचा फटका, नियोजित पालघर दौरा रद्द!

News Desk

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा राजभवनावर मोर्चा

News Desk