HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“रोशनी शिंदेंला मारहाण करणाऱ्या महिलांना तात्काळ अटक करा”, जयंत पाटलांची गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | “रोशनी शिंदेला  मारहाण करणाऱ्या महिलांना तात्काळ अटक करा, पत्रकार आणि रोशनी शिंदे यांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषदेतून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज (4 एप्रिल) राष्ट्रवादी भवन येथे झाली. यामध्ये पक्षांतर्गत निवडणूक, पक्ष संघटना, पक्ष बांधणी यावर सविस्तर चर्चा झाली. शिवाय महाराष्ट्रात पक्ष बुथवर बांधण्यासाठी काही विभागीय नेते नेमण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एक दिवसीय विभागीय शिबीरे घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदेला झालेल्या मारहाणीचा निषेध करत हल्ला करणाऱ्या महिलांना तात्काळ अटक करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील म्हणाले, “काल परवा एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकाराला धमकावण्यात आले. ही माहिती रोशनी शिंदे यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे शिंदे या महिलेला त्यामुळे मारहाण झाली,ती महिला गर्भवती आहे. महाराष्ट्रात असा हिंसाचार कधी झाला नाही. या सरकारला विरोधात बोलले पटत नाही. रोशनी शिंदे या महिलेला मारहाण झाली याचा अर्थ विरोधात कुणी बोललेले यांना खपत नाही म्हणून त्यांना मारहाण करणे, हल्ला करणे हे गंभीर प्रकरण महाराष्ट्रात झाले आहे. या घटनेचा निषेध करतानाच मारहाण करणाऱ्या महिलांना तात्काळ अटक करा, पत्रकार आणि रोशनी शिंदे यांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे. कसल्या मानसिकतेचे लोक राज्यात सत्तेत बसले आहेत हे यातून लक्षात येते असा संताप जयंत पाटील यांनी व्यक्त केला.”

उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकारात ठाणे शहर व जिल्हा नाही

“देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत पण त्यांना ठाणे शहर व जिल्हा त्यांच्या अधिकारात नाही”, असा टोला ही जयंत पाटलांनी देवेंद्र पडणवीसांना लगावला. जयंत पाटील म्हणाले, “ठाण्यातील सध्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहिली तर देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करतो की त्यांनी आज किंवा उद्यापर्यंत किंवा २४ तासात ठाण्यातील एक तरी पोलीस अधिकारी बदलून राज्यात इतरत्र हलवून दाखवावा,महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांमध्ये दम आहे . ठाणे शहरातील पोलीस खाते दबावाखाली वागत नाही यावर विश्वास ठेवू. त्यांचे ठाण्यात राज्य आहे हे मान्य करेन असे थेट आव्हान जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.”

 

Related posts

राज ठाकरेंच्या भेटीसाठी बेस्टचे शिष्टमंडळ ‘कृष्णकुंज’वर

News Desk

नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांना दिले 4 महत्वाचे सल्ले!

News Desk

प्रज्ञा ठाकूर यांना पुन्हा न्यायालयाचा दणका

News Desk