HW News Marathi
महाराष्ट्र

गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि मुंबई पोलीस आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई | राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठकी सुरू आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित आहेत. या बैठकीत नक्की कोणत्या गोष्टीवर चर्चा होत आहेत. यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची आज (९ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यात परिषदेत फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी राज्य सरकारमध्ये खलबतं

तसेच भेटीत क्रूझ ड्रग्ज प्रकरण आणि अनिल देशमुख यांना अटक या प्रकरणावर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. आज सकाळी ९ च्या दरम्यान संजय राऊत सपत्नीक पवारांच्या सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. या भेटीचे नेमके कारण काय? यावर चर्चा सुरू आहे.

अनिल देशमुखांच्या प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत सुनावली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजू शेट्टींना सत्तेची ऊब लागली – राधाकृष्ण विखे-पाटील

News Desk

भाजप मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी खेळतेय, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

News Desk

आमच्या मिरवणुकांवर दगडफेक होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही!, राज ठाकरेंचा इशारा

Aprna