HW News Marathi
व्हिडीओ

“MPSC मायाजाल, अडकू नका” स्वप्निलच्या आत्महत्येला जबाबदार कोण ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना फुरसुंगी जवळील गंगानगर येथे घडली. स्वप्नील सुनील लोणकर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे राज्यात आता खळबळ उडाली आहे. आपल्या आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेली सुसाईड नोट मन हेलावून टाकणारी आहे. स्वप्निलने या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही. फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, MPSC मायाजाल आहे यामध्ये पडू नका.” या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.

#MPSC #SwapnilLonkar #SuicideCase #MPSCStudent #Pune #MVA #Suicide #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2022 च्या Budget कडून गृहिणींच्या ‘या’ आहेत अपेक्षा

News Desk

बीडमध्ये स्त्री जन्मदर घटण्यास कोण जबाबदार? सर्वसामान्य की प्रशासन?

News Desk

Parth Pawar Uncut Speech | पार्थ पवार यांच पहिलं भाषण..

Arati More