HW News Marathi
महाराष्ट्र

‘स्वपक्षाकडूनच महिलांना डावललं जातं!’, मंदा म्हात्रेंचा पक्षावर हल्ला

नवी मुंबई | भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांच्याच पक्षावर हल्ला चढवला आहे. राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं, अशी खंत मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. त्या नवी मुंबईत लोकमत वृत्तपत्र समूहाच्या महिला सन्मान कार्यक्रमात बोलत होत्या. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस नेत्या आणि महिला बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरच मंदा म्हात्रे यांनी ही खंत बोलून दाखवली आहे.

राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं

मंदा म्हात्रे यांनी त्यांच्याच पक्षावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ““राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं. दोनदा निवडून येऊनही मला आजही संघर्ष करावं लागतोय. आजही महिलांना राजकारणात काम करताना संघर्ष करावा लागतो. एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली की पुरुष नेते पंख छाटायला सुरुवात करतात. आज ही महिलांची कामे झाकून टाकण्याचं काम केलं जातं. मला तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी लढणार, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

काय म्हणाल्या मंदा म्हात्रे?

“आपल्याच पक्षातील माणसं, जर एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली, तर मग त्याला भीती निर्माण होते, मग भीती निर्माण झाल्यावर फोटो टाकायचं नाही, कार्यक्रमाला बोलवायचं नाही, अशी जेव्हा भीती निर्माण होते, तेव्हा समजायचं आपलं कार्य चांगलं आहे. लक्षात घ्या महिलांनो. ज्यावेळी तुमचा फोटो टाकायचा असेल तेव्हा त्यांच्या मनात भीती निर्माण झाली तर समजायचं तुमच्या कार्याने धडकी निर्माण झाली आहे. काम करताना, कुठलीही भीती बाळगायची नाही, फळाची अपेक्षा बाळगायची नाही, आपण आपलं काम करत राहायचं”, असं मंदा म्हात्रे म्हणाल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यात दारुची दुकानं सुरु, मंदिरं मात्र बंद!”, देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर आक्रमक

News Desk

मनसुख हिरेन प्रकरण:  सचिन वाझेंचा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला

News Desk

चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला नवा मंत्र

News Desk