HW News Marathi
महाराष्ट्र

पार्थ पवार ‘या’भाजप नेत्याच्या भेटीला ! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…

इंदापूर | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार कायमच चर्चेत असतात. बऱ्याचवेळा भाजपच्या मुद्द्यावरून ते चर्चेत असतात. आताही तसेच काहीसे कारण आहे. पार्थ पवारयांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी हर्षवर्धन यांची सांत्वनपर भेट घेतली. महत्वाची बाब म्हणजे, हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जातात.

हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयुरसिंह पाटील यांच्या मातोश्री अनुराधा (माई) अरुणराव पाटील यांचे निधन१८ मार्चला अल्पशा आजाराने झाले होते. या पार्श्वभूमीवर पार्थ अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील, मयुरसिंह पाटील आणि पाटील कुटुंबीयांची भेट घेतली होती.

पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करुन त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासह कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आणि पाटील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

याआधीही पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीच्या विचारांच्या विरोधात भुमिका घेतलेली पाहायला मिळालं होतं. सुशांत सिंग राजपूत प्रकरण असो किंवा अयोध्येतील राम मंदिर असो पार्थ पवार यांनी भाजपच्या पावलावर पाऊल ठेवल्याचे बऱ्याचदा दिसून आले होते. यामुळे पवार कुटुंबीयांत नाराजी नाट्य घडलेले पाहायला मिळाले होते. त्यामुळे आताही पार्थ पवार यांनी भाजपच्या नेत्याची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण बदलणार का? अजित पवार, शरद पवार यांची काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

कोण आहेत अंकिता पाटील?

अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वसामान्य कार्यकर्ता झाला गोकुळचा संचालक, बंटी पाटलांच्या या विश्वासाने बयाजी शेळकेंना अश्रू अनावर

News Desk

मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे, राज्य सरकारचा मोठा निर्णय

News Desk

‘पुण्यासाठी काही सूट देता येईल का याबाबत चर्चा सुरु’, गृहमंत्र्यांची माहिती

News Desk