HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांची उंची मोदी आणि सह्याद्रीपेक्षा जास्त म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीत,राऊतांची टोलेबाजी

मुंबई | महाविकासाआघाडी सरकार गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या कोंडीत सापडले आहे. एकीकडे सरकारच्या अडचणी वाढत आहेत, सरकराचा राज्यपालांशी संघर्ष आहे, तर दुसरीकडे राज्यातील मुख्य विरोधी पक्षही आक्रमक झाला आहे. राज्यातील या प्रकरणांची झळ दिल्लीपर्यंत पोहोचत आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. संजय राऊतांच्या या टीकेनंतर आता फडणवीस आणि राऊत यांच्यात चांगलीच शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळत आहे. “संजय राऊत यांच्याकडे खूप वेळ आहे. तुमच्याकडे बातम्या नसल्या कि तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहचता. संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीत की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ”, असे म्हणत फडणवीसांना संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

“तुम्ही कंबरेमध्ये वाकून नमस्कार करता तेव्हा राज्यपाल कोणाचे नेते असतात?”

संजय राऊत त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, “मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी भाजप नेते राज्यपालांकडे जातात कारण राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते आहेत.” संजय राऊत यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, राज्यपाल हे संविधानानुसार प्रमुख आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही गेलो की राज्यपाल भाजपचे नेते असतात आणि तुम्ही कंबरेमध्ये वाकून नमस्कार करता तेव्हा राज्यपाल कोणाचे नेते असतात?”,असा प्रश्नही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले असून या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.

..म्हणूनच फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमले नसेल ! | संजय राऊत

देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावत संजय राऊत म्हणले कि, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे खूप मोठे नेते आहेत. फडणवीसांची उंची सह्याद्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिमा मलीन आणि नष्ट होईलअसे वागू नये. वारंवार सरकार बरखास्त करण्याची मागणी करुन ते विरोधी पक्षाचे हसं करून घेत आहेत”, असे म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना सल्ला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवरात्रीच्या प्रसादातून १०० जणांना विषबाधा

swarit

छत्रपती घराण्यांचा अपमान केल्याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा

News Desk

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात, कोरोना योद्ध्यांना केले अभिवादन

News Desk