HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता १६ एनडीआरएफच्या टीम तैनात

मुंबई | मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची परिस्थिती ओढवली आहे. या परिस्थितीत राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

राज्यात गेल्या २ दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या १६ टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईत ५, कोल्हापूरात ४, सांगलीत २, साताऱ्यात १, ठाण्यात १, पालघरमध्ये १, नागपूरात १, रायगडमध्ये १ अशा एकूण १६ एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार आणि आमदारांच्या घोटवलेल्या पगारांचे केंद्राने, राज्याने काय केले? – उदयनराजेंचा सवाल

News Desk

कृषिमंत्री दादा भुसे यांची पुणतांबा येथील शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

News Desk

संजय राऊत यांचं किरीट सोमय्यांना पत्र

News Desk