HW News Marathi
Covid-19

हिंमत असेल तर इतर वृत्तवाहिन्यांनाही मुलाखत देऊन दाखवा !

मुंबई | शिवसेना नेते आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अनलॉक मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे. दरम्यान “आता माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडून दाखवा”, असे थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत बोलताना भाजपला दिले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर आता भाजपच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. “हिंमत असेल तर तुम्ही इतर वृत्तवाहिन्यांना मुलाखत देऊन दाखवा”, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

इतकेच नव्हे तर “राज्यात दोन मुख्यमंत्री आहे”, असा असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी टोला लगावला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यानंतर आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, “उद्धव ठाकरेंनी ४ महिन्यांनंतर सामानाला मुलाखत दिली. इथे मॅच फिक्सिंग आहेच. मुळात संजय राऊत हे तर ठाकरेंचे स्तुतीपाठक आहेत. खरंच हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी इतर वृत्तवाहिन्यांना मुलाखत द्यावी”, असे उलट आव्हान आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर

News Desk

राज्यात ५,९६५ नवे रुग्ण आढळले

News Desk

कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना महाराष्ट्राबाबत मोदींनी व्यक्त केली चिंता

News Desk