HW News Marathi
महाराष्ट्र

‘संभाजीनगर’ची भूमिका शिवसेनेची, महाविकासआघाडीची नाही ! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे विधान

मुंबई । औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकारण पेटले आहे. याच मुद्द्यावरून महाविकासआघाडीत देखील मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याचे दिसून आले आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून जुंपलेली असताना सर्वांचेच लक्ष राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे होते. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय‌मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची भूमिका शिवसेनेची आहे महाविकासआघाडीची नाही असे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणतात की, “संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय आहे. शिवसेनेकडून अनेक वर्षांपासून औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. तो शिवसेनेचा विषय आहे. जेव्हा शासनाचा विषय येईल तेव्हा तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीत चर्चा होईल. इतक्या लवकर भाष्य करणं योग्य नाही. हा विषय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अजेंड्यावरील विषय नाही.” दरम्यान, प्रफुल्ल पटेल शिर्डीत दर्शानावेळी आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

भंडारा रुग्णालय दुर्घटनेवर भाष्य

“नेमका निष्काळजीपणा का झाला ? याबाबत चौकशी व्हायला हवी. राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने अशा घटना गांभीर्याने घेत सक्तीने कारवाई करावी”, अशी मागणी प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी ११ तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन

News Desk

“ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका”, नितेश राणेंनी डिवचले

News Desk

कृष्णकुंजच्या राजदरबारी येऊन समस्या तात्काळ सोडवल्या जातात, मावळवासियांकडून राज ठाकरेंचे आभार

News Desk