HW News Marathi
महाराष्ट्र

पवार विरुद्ध पवार ! ट्वीटरवर रंगला राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद

मुंबई | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी ट्वीट करत राज्याला स्थिर सरकार देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. या ट्वीटमध्ये अजित पवारांनी पंतप्रधानांचे आभार देखील मानले. अजित पवारांनी दुसरे ट्वीट म्हटले की, “मी राष्ट्रवादीचाच नेता आणि शरद पवार हेच आमचे नेते राहणार, आहेत. त्याचबरोबर ” भाजप-राष्ट्रवादी मिळून राज्याला स्थिर सरकार देऊ, आणि हे सरकार पुढील पाच वर्ष यशस्वी काम करेल,” असे त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. अजित पवारांच्या या ट्वीटला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले.

त्यामुळे आता काका-पुण्यातमधील कौटुंबिक वाद सध्या ट्वीटर चांगलेच रंगला दिसत आहे. शरद पवार ट्वीटमध्ये म्हटले की, “भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादीने आणि कॉंग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी करत महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याचे एकमताने ठरविले आहे. अजित पवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे,” असे पवारांनी म्हटले आहे. आता अजित पवार यांनी त्यांच्या ट्वीट हँडेलचा प्रोफाईलमध्ये बदल करत उपमुख्यमंत्री असे नमुद केले आहे.

यादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना ट्वीट करत मनवळविण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्वीटमध्ये जयंत पाटील म्हणाले की, “अजित पवार आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहात. आदरणीय पवार साहेबांच्या सावलीत आपण सगळेच वाढलो आहोत. मात्र, राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. साहेबांच्या या निर्णयाचा आदर ठेवून आपण परत या, ” असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

अजित पवारांनी ट्वीटमध्ये नेमके काय म्हटले

“मी राष्ट्रवादीचाच नेता आणि शरद पवार हेच आमचे नेते असणार आहेत. भाजप-राष्ट्रवादी मिळून राज्याला स्थिर सरकार देऊ,” हे सरकार पुढील पाच वर्ष यशस्वी काम करेल असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच अजित पवार पुढे म्हणाले की, “काळजीचे कारण नाही, थोडे धैर्य धरा,” असे आवाहन देखील राज्याच्या जनतेला त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या स्थापना का आणि कशी केली होती ?

News Desk

सतीश उकेंना घेऊन ईडीचे पथक मुंबईत दाखल

News Desk

मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींच्या भेटीला, अजित पवार आणि अशोक चव्हाणही असणार उपस्थित

News Desk