HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत शिवसेनेसोबत आहे तोपर्यंत भाजपचं स्वप्न पूर्ण होणार नाही – जयंत पाटील

मुंबई | मुंबई महापालिकेवरुन सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु आहे. यावरुन आता आघाडी सरकारमधील इतर पक्षही आक्रमक होताना दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आता या विषयावर भाष्य केले आहे. मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये. त्यांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता महापालिका निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार हे आता स्पष्ट झाले आहे.

जयंत पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी असं फडणवीसांना वाटणं साहजिकच आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत शिवसेनेसोबत आहे तोपर्यंत भाजपचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. टीव्ही नाइन मराठीशी जयंत पाटील यांनी जो संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. त्यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मिशन मुंबई सुरु केल्याची घोषणा केली तसंच कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला खात्री आहे या कार्यकारिणीच्या काळात मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल. मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू, अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा दरारा दिसू द्या! – विजय वडेट्टीवार

Aprna

परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव,काय तक्रार केली ?

News Desk

‘मुख्यमंत्र्यांसोबत संजय राऊतांची तासभर चर्चा’, तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करणार!

News Desk