HW News Marathi
राजकारण

आम्ही अजित पवारांच्या पाठीशी खंभीरपणे उभे होते !

मुंबई | “अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी झालेल्या आरोपांनंतर आम्ही खंभीरपणे यांच्या पाठिशी उभे होतो. शिवस्वराज्य यात्रेत आमच्यातील प्रत्येक नेता याबाबत खुलासा करत होता”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुकरवारी (२७ सप्टेंबर) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर शनिवारी (२८ सप्टेंबर) अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी हे भाष्य केले आहे. एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील बोलत होते.

‘अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्याचवेळी पक्ष, पक्षातील नेते अजित पवार यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे का राहिले नाहीत ?’, असा प्रश्न एका पत्रकाराने जयंत पाटील यांना विचारला. पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, “आम्ही अजित पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभे होतो. आमच्यातील प्रत्येक नेता शिवस्वराज्य यात्रेत यावर खुलासा करत होता. तुम्ही आमची भाषणे काढून बघा”, असे जयंत पाटील म्हणाले. “या बँकेच्या संचालकपदावर जर अनेक शिवसेना आणि भाजपचे नेते देखील आहेत. पण, आमच्याच नेत्यांचे नाव येते. माध्यमांनी त्याचा तपशील तपासून घ्यावा, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी (२७ सप्टेंबर) त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला. अजित पवार यांच्या अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात आणि पक्षात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर शनिवारी (२८ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर दुपारी १२.४५ वाजता अजित पवार जाईन भेट घेतली. या भेटीदरम्यान शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि इतर कुटुंबियांमध्ये कौटुंबिक चर्चा झाली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एकनाथ शिंदेंना कोण मुख्यमंत्री मानायला तयार नाही”, संजय राऊतांची बोचरी टीका

Aprna

सेना- भाजप युतीचं सत्य काय ?

Atul Chavan

वीर सावरकर पुन्हा दुर्दैवी ठरले ही वेदना आहेच!

News Desk