HW News Marathi
राजकारण

कोकणात राणे विरुद्ध ठाकरे

मुंबई | कोकण विधानपरिषदे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे याला खासदार नारायण राणे यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने राणे यांना कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार उभा करावा हा प्रस्ताव देऊन ही त्यांनी त्यांच्या पक्षातील उमेदवार उभा केला नाही. थोड्याच वेळात नारायण राणे यासंदर्भात अधिकृतपणे घोषणा करणार आहे.

राणे यांनी कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होणार आहे. शिवसेनेने कोकणातून राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीत राजीव साबळे विरुद्ध अनिकेत तटकरे लढत नसून शिवसेना विरुद्ध राणे अशी चुरशीची लढत पाहयला मिळणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कवी मनाचे महानेतृत्व हरपले | आठवले

News Desk

राज्यासाठी ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; दावोस दौऱ्यादरम्यान मोठे करार

Aprna

पंकजा मुंडे यांनी गुणरत्न सदावर्तेंची केली कानउघडणी

Manasi Devkar
महाराष्ट्र

महाराष्ट्रात उर्दू माध्यमांच्या शाळा १८ जूनला सुरू होणार

News Desk

मुंबई | शैक्षणिक वर्ष यंदा 15 जूनपासून सुरु होत आहे. परंतु 16 जूनला रमजान ईद असल्याने राज्यातील सर्व उर्दू माध्यमांच्या शाळांना 2 दिवसांची सूट देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे उर्दू शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात यंदा 18 जूनला होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात विदर्भ वगळता नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात ही 15 जूनपासून होणार आहे.

अपवादानेच या उर्दू शाळांना यंदा ईदची सुट्टी येत असल्याने त्यांना 2 दिवसांची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व उर्दू माध्यमांच्या शाळा या 15 जूनऐवजी आता 18 जूनला सुरू होणार आहेत. मात्र, इतर शाळा या 15 जूनपासूनच सुरू होतील. त्यात कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने काढलेल्या एका परिपत्रकात दिली आहे.

Related posts

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एकच डोस पुरेसा? बहुचर्चित लसीच्या चाचणीला भारतात परवानगी!

News Desk

मुंबईत मनसे- शिवसेना कामगार संघटना आमने-सामने

News Desk

#CoronaVirus : कोणत्याही शहराला ‘लॉकडाऊन’ करणार नाही !

swarit