HW News Marathi
मुंबई

सचिन सावंत हत्येप्रकरणी 7 जणांना अटक  

मुंबई | एसआरए प्रकल्पातील श्रेयवादातून शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून एसआरए प्रकल्पातील श्रेय वादातून सावंत यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच सावंत यांच्या हत्येसाठी 10 लाखांची सुपारी देण्यात आली होती.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी उत्तर प्रदेशमधून 6 जणांना तर मुंबईतून एकाला अटक केली आहे. त्याचबरोबर हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तुल देखील पोलिसांनी जप्त केले आहे. उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना 14 मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सचिन सावंत शिवसेनेच्या कुरार शाखेचे माजी उपशाखाप्रमुख होते. ते कांदिवली येथील एसआरए प्रकल्पाचे प्रवर्तक देखील होते. याच प्रकल्पात ब्रिजेश पटेल हा देखील प्रवर्तक आहे. या प्रकल्पावरुन दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली होती त्यातून सावंत यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदाच कळले !

News Desk

मुंबईत जमावाकडून पोलिसांना मारहाण

News Desk

राज ठाकरे यांना विकास कामांवर चर्चा करण्यासाठी शिवाजी पार्कवर येण्याचे आव्हान

News Desk
मुंबई

स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट फेस्टिवल

News Desk

मुंबई | सालाबादाप्रमाणे यंदाही दादरच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या महापालिका मैदानात स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. 24 एप्रिल ते 13 मे दरम्यान भरविण्यात आलेल्या या फेस्टिवलमध्ये विविध प्रकारच्या स्वदेशी बनावटीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारचे बिस्तारे, रजाई, मातीची भांडी आदि वस्तू पहायला मिळत आहेत.

प्रदर्शनात मांडण्यात आलेली शोभेची रंगीत फुले प्रदर्शनात मुख्य आकर्षण ठरत आहेत. देशातल्या कारागिरांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्राची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात विविध प्रदर्शनांचे वर्षभर आयोजन करण्यात येते परंतु या प्रदर्शनात असलेले अनेक वस्तू ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जुटचे टेबल, बांबूच्या फुलदाण्या, चंदेरी साड्या, चिकनच्या कुर्ती, आयुर्वेदातील विविध प्रकार, विविध प्रकारचे मुखवास, कोलकता च्या शांतीनिकेतनच्या सुप्रसिद्ध बॅगा खरेदीसाठी मुंबईकर विषेश गर्दी करताना दिसून येत आहेत.

अगदी 60 रुपयांपासून हजारो रुपये किंमतीच्या विविध वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातल्या तरुणींसाठी खास वैशिष्ट्य पूर्ण नक्षीकाम केलेल्या कुर्ती किंमतीने महाग असल्या तरीही तरुणींचा खरेदीकडे कल असल्याचे दिसून येत आहे. तर स्वदेशी वस्तूंचे उत्पन आणि पारंपारिक कलेची जपणूक व्हावी म्हणून सरकारने अर्थिक सह्या करावे आणि आमची कला जगभर पोहचवावी असे मत कारागिर व्यक्त करत आहेत.

Related posts

कृषीमंत्र्यांना भेटू द्या, अन्यथा सातव्या मजल्यावरून उडी मारेन video

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘परळ टर्मिनस’चे लोकार्पण

News Desk

दिवा स्थानकात एक्स्प्रेसने दुचाकीला उडवले

News Desk