HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

बाबा नशीब तुम्हाला मुलगा नाही !

मुंबई । “बाबा नशीब तुमचे की तुम्हाला मुलगा नाही,” असे भावनिक वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे पक्ष सोडून जाणाऱ्या पिता पुत्रांना टोला लगावला. सुप्रिया सुळे यांनी एका पक्षाशी निष्ठा ठेवल्यानंतर केवळ पुत्र प्रेमासाठी आणि त्याच्या स्वार्थासाठी नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. परंतु, दुसऱ्या पक्षाच्या काल परवा झालेल्या नेत्यांपुढे मुजरा करावा लागतो, ही अतिशय दुर्देवाची गोष्ट असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवार यांना उद्देशून केलेल्या भावनिक वक्तव्यात म्हटले आहे की यावेळी सुप्रिया सुळे म्हटला की, बाबा नशीब तुमचे की तुम्हाला मुलगा नाही.” पुढे त्या असे देखील म्हणाल्या आम्ही आमच्या वडिलांना आमच्या स्वार्थासाठी कुणापुढेही मुजरा करायला लावत नाही, असा टोला पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे यांनी ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. सरकारने दिलेल्या टोलमुक्तीच्या आश्वासनाचे काय झाले? असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला. ठाण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसने टोलविरोधात आंदोलन करावे, मी स्वत: या आंदोलनासाठी येईन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्रात रोजगार असतील असे मुख्यमंत्री म्हणत असतील, तर माझ्या पुणे जिल्ह्यात १० हजार बेरोजगार आहेत, त्यांना नोकऱ्या द्या, असे आव्हान सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुखांची भेट

News Desk

मावळणाऱ्यांची चिंता करू नका, उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याकडे लक्ष द्या !

News Desk

काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याला शिवसैनिकांचा विरोध

News Desk