HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांची १२ वाजता पत्रकार परिषद,कृषी विधेयकाबाबत भूमिका मांडणार ?

मुंबई | देशामध्ये भाजप सरकारने कृषी विधेयकांची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचा दावा केला.दुसरीकडे काँग्रेसने या विधेयकांना कडाडून विरोध केला.मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली नाही,त्यामुळे सध्या राज्यात भाजपविरोधी आणि केंद्रात भाजपसोबत अशी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिका आहे का या चर्चांना उधाण आले आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत गंभीर बनत चालला आहे.संसदेतसुद्धा महाराष्ट्रातील खासदारांनी आरक्षणासाठी आवाज उठवला.महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये नुकताच अर्ज दाखल केला आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप सध्या शरद पवारांना सतत टार्गेट करताना दिसत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज दुपारी १२ वाजता मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.त्यामुळे या पत्रकार परिषदेत कृषी विधेयकांबद्दल,मराठा आरक्षणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच आणि सरकारची भूमिका त्याचपद्धतीने राज्यातील कोरोना परिस्थिती या सगळ्या गोष्टीवर शरद पवार भाष्य करतात का हे पाहणं महत्वाचं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रुग्णालयातून डिस्जार्च मिळाल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा कामावर रुजू

Aprna

“हम करे सो कायदा”, अशीच फडणवीसांची प्रवृत्ती, खडसेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल

News Desk

शहीद पोलीस अधिकाऱ्यांना संपत्ती दाखवण्याची नोटीस

swarit