HW News Marathi
महाराष्ट्र

अहमदनगर शहरातील राजकीय गुंडगिरी रोखणार कोण ?

अहमदनगर | राजकीय नेत्यांमुळे ते गुंडाचे माहेरघर झाले आहे. बिहार, उत्तरप्रदेशपेक्षा येथील गुंडगिरी घातक आहे. राजकीय नेत्यांनी आपले प्रस्थ टिकवण्यासाठी गल्लोगल्ली गुंडांच्या टोळ्या तयार केल्या आहेत. त्यांना पोसण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी केली जाते.

हॉटेले, ढाब्यासह काही अैवध धंदे सुरू करून तरुणांना या कामी जुंपले जाते. त्यातून आलेल्या पैशातून हे पोसलेले गुंड निरापराध लोकांची हत्या करतात. नगर जिल्ह्यातील भानुदास कोतकर या सराईत गुन्हेगाराने अनेक निरापराध लोकांचे बळी घेतले आहेत.

परंतु सुस्थावलेल्या पोलिस यंत्रणेने आपले कार्य तत्पर केले नाही. परिणाम त्यांच्यावर कारवाई झाली नाही. पैशाच्या जोरावर आपण कुणावरही मात करू, या भ्रमात हे गुंड मंडळी नको ते कृत्य करत आहे. शेवगाव तालुक्यातील लांडे खून प्रकरणामुळे कोतकर कुटुंबिय जेलमध्ये असेल तरी त्यांचा वारस चालवण्याचे काम त्यांचे नातेवाईक करत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिवसैनिकांच्या खून प्रकरणामुळे ते प्रकर्षाने जाणवले.

कोतकरांचे व्याही व इतर नातेवाईक त्यांचा वारसा चालवत आहेत. त्यातूनच त्यांना काल खून प्रकरणात अटक झाली आहे. गुंडांना पोसण्यात या नेत्यांचा हात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यांचा बिमोड करण्यासाठी सिंघम अधिकाऱ्याची गरज आहे. परंतु अधिकारी विकले जात असल्याने हे गुंड मोकाट राहतात.

नगर जिल्ह्यातील माध्यमांमध्ये या गुंडाचा धाक आहे. पेपर किंवा वाहिनीवर संबंधित गुंडाचे छायाचित्र छापून आले तरी संबंधित छायाचित्रकारास किंवा पत्रकारास धमकी दिली जाते. हे थांबवण्यासाठी सरकारने तीन आमदारांवर गुन्हे दाखल करून त्यातील दोघांना अटक केली असली त्यांना जामिन मिळणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सर्व माध्यमात दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

News Desk

बंद लसीकरण केंद्राबाहेर घंटानाद, थाळीनाद करून केंद्र सरकारचा निषेध करणार, नाना पटोलेंचा इशारा

News Desk

“संजय राठोडांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान”, भाजप सरपंचाने दिला राजीनामा

News Desk
मुंबई

हार्दिक पटेलवर शाई फेक

News Desk

मुंबई | मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये हार्दिक पटेल यांच्यावर शाईफेक करण्यात आली. मिलिंद गुर्जर या युवकाने हार्दिक पटेलवर शाईफेक केली.

उज्जैनमधील एका हॉटेलमध्ये हार्दिक पटेल पत्रकार परिषद घेत असताना ही घटना घडली. असून प्रकारानंतर हार्दिक पटेलच्या समर्थकांनी गुर्जरला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी मिलिंद गुर्जरला अटक केली आहे.

स्वार्थासाठी हार्दिक पटेलने पाटिदार आणि गुर्जर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप या तरुणाने केला.

हार्दिक पटेल सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत आहे. शनिवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने व्यापमं घोटाळ्यावरुन शिवराजसिंग चौहान सरकारवर निशाणा साधला होता.

Related posts

अंधेरी पश्चिम परिसरातील ११ उपहारगृहांमधील अनधिकृत बांधकामे तोडली

swarit

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna

ऑटो रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ नाही, सर्वसामान्यांना दिलासा

News Desk