मुंबई | हवाई वाहतूक गैरव्यवहार प्रकरणी माजी नागरी हवाई वाहतूकमंत्रीपदी प्रफुल्ल पटेल यांची आज (६ जून) ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर राहणार नाहीत. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे चौकशीला गैरहजर राहणार असल्याची पटेल यांनी सांगितले असून चौकशी पटेलांनी चौकशीसाठी दुसरी तारीख देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. पटेल यांना वाहतूक गैरव्यहार प्रकरणी १ जून रोजी ईडीकडून चौकशीचा समन्स बजावाल होता.
Former Civil Aviation Minister & NCP leader Praful Patel to not appear before the Enforcement Directorate today in connection with airline seat allotment scam. Patel tells ANI, "Due to prior commitments, I have requested the Enforcement Directorate for another date." (file pic) pic.twitter.com/L0KE1Cgi98
— ANI (@ANI) June 6, 2019
याप्रकरणाी मी ईडीला पूर्ण सहाकार्य करेन अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली होती. परंतु आता पटेल यांच्या चौकशीला अनुपस्थित राहण्यावरून ते चौकशीला टाळाटाळ करत असल्याचे दिसत असून यामुळे त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.एव्हीएशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने ऑगस्ट २०१७ मध्ये चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी सीबीआयने हवाई वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी, एनसीआयएल आणि एअर इंडियाविरोधात एफआयआर दाखल केला होता. याप्रकरणी कॉर्पोरेट लॉबिस्ट दीपक तलवार याला अटक देखील करण्यात आली होती. ईडीच्या आरोपांनुसार दीपक तलवारनेच परदेशी विमान कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी पटेलांशी मध्यस्थी केली होती.
एमिरेट्स आणि एअर अरेबिया या दोन विमान कंपन्यांना फायदा मिळवून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ७० हजार कोटी रुपये किंमतीच्या १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण याप्रकरणांचादेखील ईडीकडून तपास सुरु आहे. प्रफुल पटेल नागरी उड्डाणमंत्री असताना हा मोठा घोटाळा झाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.