नागपूर | “आज आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण आपण एका स्टेशनवर मात्र एकत्र आलो आहोत. एकमेकांचा हात एकमेकांची साथ निदान कामपुरते तरी आपण सोडणार नाही, हा मला विश्वास आणि खात्री आहे,” असे विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान म्हणाले. नागपूर मेट्रोचा सीताबर्डी ते लोकमान्यनगर ही मेट्रो असून, ११ किलोमीटरचा मेट्रोमार्ग आहे. या मार्गावर एकूण ११ स्टेशन असून आजपासून (२८ जानेवारी) सहा मेट्रो स्टेशन सुरु होत आहेत. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या नागपूर मेट्रोचे उद्घाटन केले.
This project in totality will build a 18.5km stretch with 20 stations connection 150 villages & 7 towns making it seamless for the people of Nagpur to connect to the urban centres. pic.twitter.com/pzCQYRIrVp
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 28, 2020
या उद्घाटन सोहळ्यादरम्यान बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘माझे मित्र देवेंद्र फडणवीस’ असा केला. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस पूर्ण करण्याचा काम नितीन गडकरींनी केले. ते अत्यंत अभ्यासू माणूस असून ते भाषण सुद्धा अभ्यासपूर्वक करतात,” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले.
“श्रेय आपल्या सर्वांचे आहे. या चांगल्या कामाचे श्रेय मला लाटायचे नाही. आम्हाला श्रेय घ्याचे नाही, आम्हाला जनतेचा आशिर्वाद घ्याचा आहे. याचे श्रेय जनतेला जाते. नागपुरात सुरु असलेले प्रकल्प कधीच थांबवले जाणार नाही. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे त्याला मी कधी मागे पडू देणार नाही,” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, क्रीडामंत्री सुनील केदार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.