HW News Marathi
राजकारण

युवांना संधी दिली तर पक्षाला फायदाच होईल !

मुंबई | “विधानसभा निवडणुकीत युवांना संधी दिली तर पक्षाला याचा फायदा होईल”, असे म्हणत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदा विधानसभा निवडणुकीत ९० जागी युवांना संधी देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षांनी विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. “येत्या काळात पक्षात आलेली मरगळ घालवण्यासाठी वारंवार पराभव होणाऱ्या नेत्यांऐवजी पक्षातील तरुणांना संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे. यंदाच्या विधानसभेत जर युवांना संधी दिली तर त्याचा पक्षाला फायदाच होईल”, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का गेली?”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

Aprna

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI अहवालानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Aprna

राष्ट्रपतींनी केले मोदी सरकारच्या कामाचे कौतुक

News Desk