HW News Marathi
राजकारण

#PulwamaAttack : सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच गैरहजर | शरद पवार

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुलवामा दहशतवादी हल्लानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) सर्वपक्षीय तात्काळ बैठकी बोलविण्यात आले होते. परंतु ” जेव्हा मी सर्वपक्षीय बैठकीत गेलो, तेव्हा मोदीच बैठकीला गैरहजर होते. वास्तविक पाहता पंतप्रधानांनी या महत्त्वाच्या बैठकीला हजर राहणे आवश्यक होते. मात्र, मोदी धुळे आणि यवतमाळ येथील प्रचारसभेत आमच्यावर टीका करण्यात व्यस्त होते,” असे बोलून पवारांनी मोदींवर निशाणा साधला.

काश्मीरच्या पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी भीषण स्फोट घडवून आणला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर देशभरातून या दहशतवादी हल्लेचा निषेध व्यक्त होत आहे.तर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी सर्व स्थरातून होते आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना बोलाविण्यात आले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज थेट ‘शिवसेना भवनावर’ धडकला विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचा मोर्चा

News Desk

सेना-भाजपची युती होऊ शकते | संजय राऊत

News Desk

अजित पवार आणि पार्थ पवारांसंबंधी बारामतीतून आली मोठी बातमी

swarit