नवी दिल्ली | मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने राज्यपाला आनंदीबेन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ, नेते ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, विवेक तन्खा हे काँग्रेसचे शिष्टमंडळाने आज (१२ डिसेंबर) आनंदीबेन यांची भेट घेतली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे १२१ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याची विनंतीही केली.
Madhya Pradesh: Congress delegation met Governor Anandiben Patel to stake claim to form the government, earlier today. #AssemblyResults2018 pic.twitter.com/DKqMaRd7bP
— ANI (@ANI) December 12, 2018
काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये बसपाच्या दोन, सपाच्या एका आणि ४ अपक्षांचा पाठिंबा आपल्याला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. आम्ही सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. आमच्याकडे १२१ आमदारांचे पाठबळ आहे, असे काँग्रेस नेते नरेंद्र सलुजा यांनी सांगितले. दरम्यान, मध्यप्रदेशातील मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. काँग्रेसने अद्यापही त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने कमलनाथ आणि सिंधिया समर्थकांनी आपआपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दुपारी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा दिला आहे.
Bhopal: Shivraj Singh Chouhan tenders his resignation to the Governor Anandiben Patel, earlier today #MadhyaPradeshElections2018 pic.twitter.com/3MKTBDqc21
— ANI (@ANI) December 12, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.