HW News Marathi
राजकारण

धुळे महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

धुळे | धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपने ४९ जागा मिळवत भाजपने धुळे महापालिका काबीज केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना यांची कडवी झुंज भाजपने मोडित काढलत विजय मिळाविला आहे.अनिल गोटेंना धुळ्याच्या जनतेने नाकारल्याची प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

धुळे आणि अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकांची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाली. धुळ्यात काल (रविवारी) ६० टक्के मतदानाची नोंद झाली होती. ७४ जागा असलेल्या धुळे महापालिकेत बहुमताचा आकडा ३८ होता.

भाजपने ४९, काँग्रेसने पाच, तर राष्ट्रवादीने नऊ, (आघाडी एकूण १४) जागा जिंकल्या. एमआयएमने तीन जागांवर खाते उघडले. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले. लोकसंग्रामला केवळ एक जागा जिंकता आली, तर बसपलाही एकच जागा खिशात घालता आली. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री महादेव जानकर यांना दिलासा

News Desk

धनंजय मुंडेच्या गैव्यवहाराचा मुद्दा सभागृहाता गाजला

News Desk

मुंबईत शिवसेनेला जोरदार झटका शिवसेनेचे वाघ मनसे मध्ये

News Desk