HW News Marathi
देश / विदेश

कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची देशाच्या नव्या आर्थिक सल्लागार पदी नियुक्ती

नवी दिल्ली | इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची देशाचे नव्या आर्थिक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. सुब्रह्मण्यम यांची जगातील आघाडीच्या बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नेंस आणि इकॉनॉमिक पॉलिसी एक्सपर्ट्समध्ये गणना गेली जाते. सरकारने एक पत्रक काढून ही घोषणा केली आहे.

कृष्णमूर्ती हे अरविंद सुब्रह्मण्यम यांची जागा घेतील आहे. अरविंद सुब्रह्मण्यम यांनी जुलै महिन्यात वैयक्तिक कारणांनी राजीनामा दिला होता. कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम हे इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये फायनान्सचे असोसिएट्स प्रोफेसर आहेत. तसेच सेंटर फॉर अॅनॅलिटिकल फायनान्समध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. सुब्रह्मण्यम यांनी शिकागो बूथ येथून पीएचडी पदवी मिळली आहे. तसेच ते आयाआयटी आणि आयआयएमचे विद्यार्थी होते.

अॅकॅडमिक करिअरची सुरुवात करण्यापूर्वी सुब्रह्मण्यम यांनी न्यूयॉर्क मधील जे. पी. मॉर्गन चेजसोबत सल्लागार म्हणून काम पाहिले होते. तसेच ते आयसीआयसीआयचे एलिट डेरिवेटिव्ह ग्रुपच्या मॅनेजमेंट रोलमध्येही त्यांनी आपील सेवा दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुठल्याही क्षणी शशिकला यांना अटक होणार

News Desk

बॅंकांच्या दोन दिवसीय संपामुळे होणार एटीएममध्ये खडखडाट

News Desk

चांद्रयान – २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर मोदींकडून इस्रोचे कौतुक

News Desk