HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या १० दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर | काश्मीर पोलिसांनी सोमवारी(३ डिसेंबर) मोठी कारवाई करत दक्षिण काश्मिरातील दोन भागात लपलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेच्या १० दहशतवाद्यांना अटक केले आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल आणि पंपोर भागातून या १० जणांना पकडण्यात आले.

काश्मीर खोर्‍यात विध्वंसक कारवाया करण्याचा मोठ्या घातपाताचा कट रचण्यात आला होता, तो या दहशतवाद्यांच्या अटकेनंतर उघडकीस आला, असे पोलिसांकडून माहिती मिळाली आहे. दहशतवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यात जिलेटिन कांड्या, डिटोनेटर, आयईडी बनविण्याचे साहित्य आणि ग्रेनेडचा समावेश आहे.

त्रालमध्ये पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे युनिस नबी मलिक (पिंगलिश), फैयाज अहमद वानी (रेशीपोरा), रियाज अहमद गनई (नगीनपोरा) आणि बिलाल अहमद राथर (नगीनपोरा) अशी आहेत. पंपोरमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांमध्ये जावेद अहमद पर्रे (वबपोरा ख्रियू), यासिर बशीर वानी (वबपोरा), ताहिर युसूफ लोन (ख्रियू), रफिक अहमद बट (शारशाली), जावेद अहमद खांडे (ख्रियू) आणि इमरान अहमद नजार (ख्रियू) यांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पोलिस ठाण्याच्या उद्घाटनानंतर पहिली तक्रार स्थानिक आमदारा विरोधातच

News Desk

मेघालयात त्रिशंकू अवस्था

News Desk

आईचे दूध मिळत नसल्याने दरवर्षी अडीच लाख बालकांचा मृत्यू

News Desk
राजकारण

रिपब्लिकन पक्षाचा धर्मादाय आयुक्त कार्यलयावर हल्लाबोल 

News Desk

मुंबई | महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर प्रशासक नियुक्त करण्याची चाहूल लागताच आज रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयावर वरळी येथे तीव्र निषेध निदर्शने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी रिपाइंच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती या रिपाइं चे पदवीधर शिक्षक मतदार आघाडी चे अध्यक्ष घनश्याम चिरणकर आणि रिपब्लिकन बहुजन परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी दिली आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यलयावर आज झालेल्या हल्लाबोल आंदोलनात रिपाइं चे ज्येष्ठ नेते चंद्रकांत कसबे; दयाळ बहादूरे; संजय पवार; सचिन बनसोडे;सचिन आठवले; प्रशांत मोरे;शिरीष चिखलकर; विशाल गायकवाड;जालिंदर बर्वे;बाळाराम बनसोडे; बाळकृष्ण गायकवाड आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

तुम्ही ‘त्यांनी’ दिलेले पैसे घ्या, मात्र मत ‘आप’लाच द्या !

News Desk

अहमदनगरमध्ये महानगरपालिकेच्या मतदान केंद्राबाहेर लाठीचार्ज

News Desk

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात कायदा सुव्यवस्थेसाठी केंद्रीय सुरक्षा दल पाठवा”, संजय राऊतांची मागणी

Aprna