HW News Marathi
महाराष्ट्र

ST कर्मचारी आक्रमक! शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक आंदोलन

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी चप्पल फेक आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचारी यांनी आक्रमक पवित्रा घेत शरद पवारांच्या निवसस्थानी केली आहे. एसटीचे शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे, या मागणीवरून आक्रमक पवित्रा घेत कर्मचाऱ्यांनी दगड आणि चप्पलफेक शरद पवारांचा घराबाहेर आंदोलन करत आहेत. शरद पवारांविरोधात संपकारी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून आंदोलन करत आहेत. 

आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील घेरले होते. माझे आई-वडिल आणि माझी मुलगी घरात आहे. ते सुरक्षित आहे की नाही यांची खात्री मला करून द्या. मी तुमच्या सर्व मागण्याऐकून घेण्यास तयार आहे. तुम्ही शांत राहिला तर मी तुमच्या सर्व मागण्या शांतपणे बसून चर्चा करण्यास तयार आहेत. तुम्ही शांत व्हा, तुमच्या मागण्या ऐकण्यासाठी तयार आहे, अशी हात जोडून विनंती सुप्रिया सुळेंनीआंदोलनकर्त्यांशी विनंती केली. 

शरद पवारांच्या निवसस्थानी एसटी आंदोलनकर्त्यांनी घेराव केल्यानंतर मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील सह मोठा फौजफाटा सिल्व्हर ओक त्यांच्या निवसस्थानी दाखल झाले. सध्या पोलिसांनी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात घेतले असून शरद पवारांच्या निवसस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे तरी राणेंना सुखाने झोप लागेल, शरद पवारांचा खोटक टोला 

News Desk

इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत पीसीपीएनडीटी नोटीशीला दिले उत्तर

News Desk

NCBच्या चौकशीत काय सुरू आहे याचा तपशील माध्यमांना माहिती कसा मिळत आहे? सचिन सावंतांचा प्रश्न

News Desk