HW News Marathi
राजकारण

#RamMandir : अयोध्येत राम मंदिरासाठी हिंदुत्ववादी संघटनांची सभा

अयोध्या | विश्व हिंदू परिषद आणि शंकराचार्यांच धर्मसभा आज (२५ नोव्हेंबर)ला पार पडणार आहे. सभेच्या आयोजकांच्या मते, या सभेसाठी ३ लाखपेक्षा जास्त राम भक्त येणार असल्याचे सांगितले आहे. ही धर्मसभा चार तास चालेणार असून यासाठी साधू संतासह विहिंप आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित असतील. मात्र व्यासपीठावर फक्त साधू संत उपस्थित असणार आहे.

सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असून त्यांनी आज (२५ नोव्हेंबर)ला रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल(२४ नोव्हेंबर)ला राममंदिर उभारण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. राममंदिरासाठी किती दिवस वाट बघावी लागणार असल्याचा सवाल करत राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा, अशा शब्दात उध्दव ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

अयोध्येत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक अतिरिक्त पोलीस महासंचालक स्तराचे अधिकारी, एक पोलीस महानिरीक्षक, तीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक, १० अतिरिक्त पोलीस अधीक्षक, २१ क्षेत्र अधिकारी, १६० पोलीस निरीक्षक, ७०० कॉन्स्टेबल, तसेच पीएसीच्या ४२ आणि आरएएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय एटीएसचे कमांडो आणि आकाशातून नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही याआधी यात्रा-भेटी का नाही घेतलात?,” दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल

Aprna

माझ्या शेतकऱ्यांना आणि आम्हाला डिवचलात तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही – अजित पवार

swarit

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारल्याच्या मुद्यावरून अजित पवार सभागृहात आक्रमक

Aprna