HW News Marathi
राजकारण

‘ठग ऑफ महाराष्ट्र’ पोस्टरमधून विरोधकांकडून सरकारवर टीका

मुंबई | ‘ठग ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘ठगबाजीची चार वर्षे’ या पोस्टरद्वारे विरोधकांची सरकारवर टीका केली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानपूर्वी बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी लावण्यात आलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधी ठरले आहे. या पोस्टरमध्ये ठग्स ऑफ हिंदुस्थानच्या पार्श्वभुमीवर विरोधाकांनी ठग ऑफ महाराष्ट्र असे नाव देऊन हे पोस्टर लावले आहे. ठग्स ऑफ हिंदुस्तान या सिनेमात आमीर खानच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिताभ बच्चन यांच्या जागी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.या पोस्टरमधून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली आहे.

तसेच सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या ठगबाजीचा पाढाच वाचण्यात आला आहे. त्यामध्ये जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, ग्राहकांशी ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी आणि बेरोजगारांशी ठगबाजी, अशे विविध उदाहरणे देऊन सरकारचे अपयश सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू असलेल्या विरोधी पक्षाच्या गटनेत्यांच्या बैठकीला विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, अबू आसिम आझमी, बसवराज पाटील, हेमंत टकले, जिवा पांडू गावीत, कपिल पाटील, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, विद्याताई चव्हाण आदी नेते उपस्थित आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#LokSabhaElections2019 : सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या

News Desk

“ऋतुजा रमेश लटकेंना शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यासाठी दबाव”, अनिल परबांचा आरोप

Aprna

स्वबळाच्या नाऱ्याचा फटका शिवसेनेलाच ?

Gauri Tilekar
राजकारण

Bhima Koregaon Case : वरवर राव यांना महाराष्ट्र पोलिसांनाकडून अटक

News Desk

पुणे | भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र पोलिसांनी एक्टिविस्ट वरवर राव यांना त्यांच्या हैदराबाद घरातून अटक करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस वरवर राव यांना पुणे कोर्टात हजर करणार आहेत. राव यांची नजरकैदचा कालावधी शनिवारी (१७ नोव्हेंबर)ला संपला आहे. तसेच राव यांनी कोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. परंतु ही याचिका कोर्टाने फेटाळून लावल्यामुळे राव यांना अटक करण्यात आले.

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी २८ ऑगस्टला देशातील विविध राज्यातील पाच विचारवंतान “अर्बन नक्सल”चा आरोप ठेवत यांना अटक करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी वरवर राव यांच्या व्यतिरिक्त अरुण फरेरा, वर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा यांना अटक करण्यात आले होते. या पाचही जणांना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Related posts

भाजप उमेदवारांची आज होणार घोषणा

News Desk

जयंत पाटील यांच्या स्वागताला हजारो कार्यकर्ते रस्त्यावर! नियम तोडले म्हणून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का?

News Desk

काँग्रेस आता तीच चूक महाराष्ट्रात करायला जात आहे !

News Desk