HW News Marathi
देश / विदेश

इंधन दरांमध्ये घट कायम, पेट्रोल-डिझेल १७ पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात घट होत आहे. आज(१० नोव्हेंबर) पुन्हा इंधन दरात घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात १७ पैशांची तर, डिझेलच्या दरात १७ पैशांची घट झाली आहे. आता, मुंबईकरांना एक लिटर पेट्रोलसाठी ८३.४० रुपये मोजावे लागणार आहेत. तर, एक लिटर डिझेलसाठी मुंबईकरांना ७६.०५ रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थोडासा का होईना पण दिलासा मिळत आहे.

राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा इंधनात घट झाली आहे. पेट्रोल १७ पैशांनी तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीमध्ये प्रतिलिटर पेट्रोलसाठी ७७.८९ रुपये, तर प्रतिलिटर डिझेलसाठी ७२.५८ रुपये मोजावे लागणार आहेत.७ नोव्हेंबर दिवस वगळता गेल्या सलग काही आठवड्यांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने घट होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीएनबी घोटाळा प्रकरणी मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला कोलकात्याहून अटक

Gauri Tilekar

३ वर्षांच्या मुलीसह १०० कोटींची संपत्ती सोडून संन्यास घेणार

News Desk

महीला आयएएस अधिकारी लैंगिक छळाची शिकार

News Desk